ब्रह्मपुरी क्षेत्रातील रस्ते बांधकामासाठी २० कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 11:08 PM2018-02-12T23:08:11+5:302018-02-12T23:08:29+5:30
आ. विजय वडेट्टीवार यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील विविध गावातील रस्ते बांधकामासाठी २० कोटींचा निधी शासनाकडून मंजूर झाला आहे. त्यामुळे ग्रामीण नागरिकांच्या रस्ते विषयक समस्या सुटणार आहेत.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : आ. विजय वडेट्टीवार यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील विविध गावातील रस्ते बांधकामासाठी २० कोटींचा निधी शासनाकडून मंजूर झाला आहे. त्यामुळे ग्रामीण नागरिकांच्या रस्ते विषयक समस्या सुटणार आहेत.
सावली तालुक्यातील व्याहाड बुज ते वाघोली, लोंढोली ते साखरी, ब्रह्मपुरी तालुक्यातील कोसंबी ते आवळगाव रस्ते नादुरुस्त असल्याने रहदारीस अयोग्य होते. त्यामुळे या रस्त्याची पाहणी आमदार विजय वडेट्टीवार यांनी करून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत सदर रस्त्याचे नव्याने बांधकाम करण्यासाठी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग यांच्याकडे निवेदन देवून वारंवार पाठपुरावा केली. त्यांच्या परिश्रमाला यश आले असून व्याहाड बुज ते वाघोली, लोंढोली ते साखरी, कोसंबी ते आवळगाव, खरबी ते सायगाटा मरवाही नाचनभट्टी, सावली ते मेटेगाव या रस्त्याचे नव्याने बांधकाम करण्यासाठी रुपये १८ कोटी पाच लाख ११ हजार निधी तसेच पाच वर्ष देखभाल व दुरुस्ती या कामासाठी एक कोटी २५ लाख १३ हजार असे एकूण रुपये १९ कोटी ३० लाख २४ हजार निधीसह प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
आ. विजय वडेट्टीवार ब्रह्मपुरी क्षेत्रातील सर्व गावांचा जनसंपर्क अभियानांतर्गत दौरा केला. या दौºयाप्रसंगी रहदारीस अयोग्य असलेल्या रस्त्यांच्या संदर्भात व्याहाड बुज, वाघोली, लोंढोली, साखरी, कोसंबी, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, आवळगाव, खरबी, सायगाटा, गडबोरी, मेटेगाव, उमरवाही, नाचनभट्टी या गावातील नागरिकांनी आ. वडेट्टीवार यांना भेटून निवेदन दिले.
त्यावेळेस आ. विजय वडेट्टीवार यांनी नागरिकांच्या उपस्थिीतच सर्व रस्त्यांची पाहणी केली होती. ब्रह्मपुरी तालुक्यातील कोसंबी ते आवळगाव रसचत्यासाठी दोन कोटी ३७ लाख २२ हजार आणि पाच वर्ष नियमित देखभाल व दुरुस्ती याकरिता १६ लाख ६९ हजार, खरबी ते सायगाटा रस्त्यासाठी दोन कोटी ६६ लाख ६७ हजार आणि देखभाल व दुरुस्ती याकरिता १८ लाख ४७ हजार तसेच सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी-उमरवाही नाचनभट्टी रस्त्यासाठी दोन कोटी ८६ लाख ८४ हजार आणि पाच वर्ष नियमित देखभाल व दुरुस्ती याकरिता रुपये १९ लाख ९१ हजार रूपयाचा निधी मंजूर झाला आहे. या कामास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे गावकºयांची रस्त्याची समस्या सुटणार आहे.