राजुरा विधानसभा क्षेत्र विकासासाठी २० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 12:19 AM2017-08-06T00:19:12+5:302017-08-06T00:19:40+5:30

निर्वाचन क्षेत्रातील मतदार संघात २० कोटींचा विशेष निधी नगरपरिषद हद्दीतील विविध विकास कामे करण्याकरिता देऊन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती केली.

20 crore for the development of Rajura assembly constituency | राजुरा विधानसभा क्षेत्र विकासासाठी २० कोटी

राजुरा विधानसभा क्षेत्र विकासासाठी २० कोटी

Next
ठळक मुद्देसंजय धोटे यांची माहिती : सुधीर मुनगंटीवार यांनी केली वचनपूर्ती

लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : निर्वाचन क्षेत्रातील मतदार संघात २० कोटींचा विशेष निधी नगरपरिषद हद्दीतील विविध विकास कामे करण्याकरिता देऊन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती केली.
नगर पंचायत गोंडपिपरीकरिता रस्ते, नाली, पाणी पुरवठा योजना, सार्वजनिक ठिकाणी सौंदर्यीकरणाकरिता १० कोटींची तरतूद करण्यात आली. राजुरा नगरपरिषद करिता आमदारांना २२ नोव्हेंबर ट२०१६ रोजी दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने रस्ते, नाली व अनेक विकास कामांसाठी चार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. गडचांदूर नगर परिषदकरिता रस्ते, नाली विविध प्रकारच्या विकास कामेकरिता दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. कोरपना नगर पंचायतकरिता रस्ते, नालीबांधकाम तसेच विविध विकास कामाकरिता दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. जिवती नगर पंचायतकरिता रस्ते, नाली बांधकाम तसेच विविध विकास कामाकरिता दोन कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सन २०१७-२०१८ च्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे करण्यात आली.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मागील वर्षी राजुरा निर्वाचन क्षेत्रातील नगर परिषद व पंचायत हद्दीतील विकास कामे करण्याकरिता १३ कोटी रुपये दिलेले होते. तसेच या वेळी सुद्धा विशेष मागणी करण्यात आली.
२० कोटी रुपयांचा निधी राजुरा विधानसभेकरिता आ. अ‍ॅड. संजय धोटे यांच्या मागणीनुसार दिले आहेत. आ. धोटे यांच्या प्रयत्नातून मतदार संघाच्या विकासाला गती येत आहे. मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे.
मागील वर्षी ना. मुनगंटीवार यांनी दिलेल्या निधीतून मोठ्या प्रमाणावर शहरातील विकासाची कामे झालेली आहेत. शहरातील अनेक भागात चांगले रस्ते, नसल्याने नागरिकांंना त्रास होत होता. त्यामुळे आ. अ‍ॅड. संजय धोटे यांनी मुबई येथे पावसाळी अधिवेशनात ना. मुनगंटीवार यांची भेट घेऊन त्यांना मतदार संघासाठी निधीची मागणी केली. व त्यांनीही तत्परतेने निधी उपलब्ध करून देऊ असे सांगितले. व निधीसुद्धा दिला.

Web Title: 20 crore for the development of Rajura assembly constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.