२० जणांचा मृत्यू, ६७४ कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:26 AM2021-05-17T04:26:55+5:302021-05-17T04:26:55+5:30

चंद्रपूर : मागील २४ तासांमध्ये कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढल्याने काही प्रमाणात का होईना, दिलासा मिळाला आहे. रविवारी ६७४ ...

20 killed, 674 injured | २० जणांचा मृत्यू, ६७४ कोरोनाबाधित

२० जणांचा मृत्यू, ६७४ कोरोनाबाधित

Next

चंद्रपूर : मागील २४ तासांमध्ये कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढल्याने काही प्रमाणात का होईना, दिलासा मिळाला आहे. रविवारी ६७४ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून २० जणांचा मृत्यू झाला; तर एक हजार २८३ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ७७ हजार ५७५ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ६६ हजार २२६ झाली आहे. सध्या १० हजार ९७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ४ लाख ३४ हजार ७६० नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यांपैकी ३ लाख ५३ हजार ९०३ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १२५२ बाधितांचे मृत्यू झाले असून यांपैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ११५९ , तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली ३५, यवतमाळ ४०, भंडारा ११, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे.

बाॅक्स

रविवारचे मृत्यू

रविवारी मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील गजानन महाराज मंदिर चौक परिसरातील ६२ व ७७ वर्षीय पुरुष, तुकुम येथील ७५ वर्षीय महिला, रामनगर येथील ४२ वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय पुरुष. भद्रावती तालुक्यातील कोंढा येथील ५४ वर्षीय महिला, ६० वर्षीय महिला, घोडपेठ येथील ३१ वर्षीय महिला. बल्लारपूर तालुक्यातील ६५ वर्षीय पुरुष, सावली तालुक्यातील ७० वर्षीय महिला, चिमूर तालुक्यातील ६२ वर्षीय पुरुष, वडाळा पैकू येथील ६० वर्षीय पुरुष, सिंदेवाही तालुक्यातील नांदगाव येथील ६५ वर्षीय महिला, नागभीड तालुक्यातील नवखळा येथील ५५ वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील कुर्झा येथील ६० वर्षीय पुरुष, राजुरा तालुक्यातील ४६ वर्षीय पुरुष. मूल तालुक्यातील ५९ वर्षीय महिला, कोरपना तालुक्यातील ४५ वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय महिला तर वणी-यवतमाळ येथील ५५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

बाॅक्स

असे आहेत बाधित

चंद्रपूर पालिका २२७

चंद्रपूर तालुका २०

बल्लारपूर ८०

भद्रावती ४७

ब्रह्मपुरी २०

नागभीड १०

सिंदेवाही ३१

मूल ३८

सावली २६

पोंभुर्णा ३४

गोंडपिपरी ०४

राजुरा ३४

चिमूर ०४

वरोरा ४५

कोरपना ४०

जिवती ०८

इतर ०६

Web Title: 20 killed, 674 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.