दुर्गापूर येथील आठवडी बाजारातून २० मोबाईल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:16 AM2019-09-10T00:16:39+5:302019-09-10T00:17:19+5:30

दुर्गापूर येथे ताडोबा मार्गावर दर रविवारी आठवडी बाजार भरतो. दिवसभर खरेदी करणाऱ्यांची गर्दी असते. गजबजलेल्या बाजारात मोबाईल चोरट्यांची टोळी सक्रीय झाली. वस्तु खरेदीत मग्न असणाऱ्या २० लोकांच्या खिशातून चोरट्यांनी मोबाईल लंपास केले. ग्राहक शरद अवचाट यांनी एका दहा वर्षीय बालकाला मोबाईल चोरताना रंगेहाथ पकडून पोलिसंच्या स्वाधीन केले. दुर्गापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

20 mobile thief from weekly market in Durgapur | दुर्गापूर येथील आठवडी बाजारातून २० मोबाईल लंपास

दुर्गापूर येथील आठवडी बाजारातून २० मोबाईल लंपास

googlenewsNext
ठळक मुद्देपळसगावात घरफोडी, ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
दुर्गापूर : येथील रविवारच्या आठवडी बाजारातून चोरट्यांनी २० व्यक्तींचे मोबाईल लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीला घेतले आहे.
दुर्गापूर येथे ताडोबा मार्गावर दर रविवारी आठवडी बाजार भरतो. दिवसभर खरेदी करणाऱ्यांची गर्दी असते. गजबजलेल्या बाजारात मोबाईल चोरट्यांची टोळी सक्रीय झाली. वस्तु खरेदीत मग्न असणाऱ्या २० लोकांच्या खिशातून चोरट्यांनी मोबाईल लंपास केले. ग्राहक शरद अवचाट यांनी एका दहा वर्षीय बालकाला मोबाईल चोरताना रंगेहाथ पकडून पोलिसंच्या स्वाधीन केले. दुर्गापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पळसगावात घरफोडी, ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त
येनबोडी : बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव येथे बंडू भाऊराव लोखंडे यांच्या घराचे कुलूप तोडून रोख ३५ हजार व दागिण्यांसह ५५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना शनिवारी दुपारी २ ते ३ वाजताच्या दरम्यान घडली. बंडू लोखंडे हे फुटपाथवर गुपचुप चटपट्याचा व्यवसाय करतात. शिवाय, धान रोवणीच्या कामातून मिळविलेली रक्कम व दागिणे घरी ठेवले होते. शनिवारी घराला कुलूप लावून शेतीच्या कामाला गेले असता अज्ञात चोरट्यांनी सामानाची नासधूस व लॉकर फोडून दिसल्याने ५५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. कोठारी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

३० हजारांची चोरी
बल्लारपूर : येथील विद्यानगर वार्डातील वसंत वानखेडे यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आलमारीतील ३० हजाार रूपये चोरून नेल्याची घटना रविवारी घडली. वानखेडे हे गावाहून परत आल्यानंतर चोरीची ही घटना उजेडात आली. या घटनेची पोलिसात तक्रार केली आहे.

Web Title: 20 mobile thief from weekly market in Durgapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर