२० टक्के नागरिकांना हृदयरोगाचा धोका

By Admin | Published: September 29, 2016 12:55 AM2016-09-29T00:55:41+5:302016-09-29T00:55:41+5:30

आजच्या परिस्थितीत देशातील महाभयंकर रोगात हृदयविकाराचा समावेश होतो.

20% of people are at risk of heart disease | २० टक्के नागरिकांना हृदयरोगाचा धोका

२० टक्के नागरिकांना हृदयरोगाचा धोका

googlenewsNext

आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे : बदललेली लाईफस्टाईल आणि आरोग्याकडे होत असलेले दुर्लक्ष कारणीभूत
परिमल डोहणे चंद्रपूर
आजच्या परिस्थितीत देशातील महाभयंकर रोगात हृदयविकाराचा समावेश होतो. एका अहवालानूसार पाच व्यक्तीच्या मागील एका व्यक्तीला हृद्यरोग होण्याची शक्यता आहे. वाढत्या धकाधकीच्या जीवनात विविध आजारांनी थैमान घातले आहे. यात असाध्य रोगही आहेत. या विविध आजारांपासून सुटका करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचे प्रयत्न सुरु असले तरी, रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ चिंतेचा विषय आहे.
सद्याची परिस्थिती पाहता वर्ल्ड हेल्थ आर्गनायझेशनच्या अंदाजानूसार २०२० पर्यंत हृदय रोगाचे सर्वात जास्त रुग्ण भारतात राहण्याची शक्यता आहे. बदलत्या जीवनशैलीच्या परिणामामुळे हृदयरुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. चुकीचा आहार, वेळी-अवेळी होणारे जेवण, चमचमीत पदार्थांचा आस्वाद, थंड पदार्थांचे सेवन, मद्यप्राशन, धुम्रपान, गुटखा आणि तंटाबूजन्य पदार्थांच्या सेवनामुळेही हृदयरोग रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
जिल्ह्यात हृदयविकाराचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या २० ते २२ टक्के आहे. मागील काही वर्षात हे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेमध्ये या आजाराचे प्रमाण शहरी भागात जास्त आहे. प्रदूषण, धकाधकीचे जीवन आणि बैठ्या कामामुळे शारीरिक व्यायाम होत नसल्याने प्रमाण वाढले आहे. ग्रामीम भागात तंबाखुजन्य पदार्थाच्या सेवनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येते. जिल्ह्याच्या शहरी भागात कारखान्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने येथील जनता प्रदूषणाच्या आजाराने गुरफटली आहे.
तरुण वयातही हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. ३० वर्षाच्या वयाच्या आत हृदयविकास उद्भवणे ही आता विशेष गोष्ट राहिलेली नाही.
वर्ल्ड हेल्थ आर्गनायझेशनच्या प्रती व्यक्ती महिन्याचे अर्धा किलो तेलाचा आहार हवा. मात्र आपल्याकडे चमचमीत तेलाचे पदार्थाचे सेवन केले जातात. हृदयरोग असलेल्या रुग्णापैकी ५० टक्के रुग्णांना आजाराबाबत माहितीच नसते. त्यामुळे आजाराची आवश्यक ती काळजी न घेतल्यामुळे व डॉक्टरांचा सल्ला न घेतल्यामुळे हृदयविकाराचा एकाएकी झटका आलेल्या रुग्णांमध्ये अनेकांचा मृत्यू होतो. अतिधुम्रपान, रक्तातील कोलेस्टेरॉल या घटकाचे जादा प्रमाण, जास्त वजन, मधुमेह, पुरेशा शारिरीक चलनवलनाचा अभाव, मानसिक ताण ही हृदयविकाराचा झटका येण्याची मुख्य कारण आहेत. हृदयविकाराच्या आजारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात एसीजी, टीएमटी, आयसीयु सुविधा उपलब्ध आहे. तालुकास्तरावर उपचाराची सुविधा आहे. शस्त्रक्रियेची सुविधा नसल्याने रुग्णांना नागपूर गाठावे लागते. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून हृदयरुग्णाला आर्थिक सहाय्यसुद्धा मिळते. त्याचा लाभही रुग्णांना घेता येतो.

नियमित मानसिक तणाव
यामुळे रक्तातील अड्रीनीयलनची पातळी वाढते. त्यामुळे हृदयावर दुष्परिणाम पडतो. चिडचिडपणा आणि कामात लक्ष लागत नाही.
नियमित व्यायामाचा अभाव
बैठे काम, वाहनांची सहज उपलब्धता यामुळे योग्य त्या प्रमाणात शारीरिक हालचाल होत नाही. परिणामी पचन बिघडते आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. जादा वजन, मधुमेह अनुवांशिकता ही हृदयविकाराचा झटका येण्याची कारणे आहे.
उच्च रक्तदाब
यामुळे धमण्यांच्या अंतस्तरावर इजा होते. यावर शरिरामार्फत कोलेस्टेरॉलचा लेप लावला जातो. अशा प्रकारे तेथे कोलेस्टेरॉल जमू लागतात.

प्रथमोपचारासाठी हे करावे
आपल्या कुटुंबातील व्यक्तीला हार्टअटॅक आल्यास रुग्णांचे प्रथम सांत्वन केले पाहिजे. सहानुभूतीने त्यांच्यातील भीती दूर केली पाहिजे. शारीरिक जड कामांपासून रुग्णाला दूर ठेवावे. अचानक अटॅक आल्यास झोपवून किंवा लेटून ठेवावे आणि तत्काळ वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
रुग्णांनी कारावयाचे प्रयत्न
रक्तशर्करेबरोबर मेदघटक व होमोसिस्टिम या चाचण्याही अधून-मधून कराव्यात. वर्षातून दोनदा ईसीजी चाचणी करावी, लघवीतून वाहून जाणारी प्रथिनेही हृदयविकार असल्याचे दर्शवितात. म्हणून युरिन सायक्राल ही चाचणी नियिमत करावी. बिपी व शुगर असलेल्या रुग्णांनी नियमित तपासणी करावी.
वेळी अवेळी आहार टाळावे
चुकीच्या आहारामुळे, वेळी-अवेळी जेवणामुळे, चमचमीत पदार्थांचे सेवन करण्यामुळे, थंड पदार्थांचे सेवन करण्यामुळे, मद्यसेवन, धुम्रपान, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळेही हृदयविकाराला पाठबळ मिळते. त्यामुळे असे पदार्थ टाळले पाहिजे. जेवनात मिठाचे प्रमाण कमी असावे.

आनंददायी रहावे
आजचे जीवन अत्यंत गतीशील झाले आहे. मात्र या जीवनात आनंददायी राहणे गरजेचे आहे. आपल्या दैनंदीन आहारात पालेभाज्याचा वापर करावा, प्राणायाम योगासने करावीत, ४० वर्ष वयावरील व्यक्तींनी सहा महिन्यातून एकदा रक्तदाब व शुगरची तपासणी करावी. व्यसन करणे टाळावे, हृदयरोग टाळण्यासाठी वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे. नियमित संतुलित व्यायाम करावा, रक्ताची चाचणी नियमित करावी. डॉक्टरांचा नियमित सल्ला घेऊन त्यांच्यानूसार औषधांचे सेवन करावे.
- डॉ. गोपाल मुंधडा, चंद्रपूर

सात्विक जेवण, नियमित व्यायाम
मानवाने रोजच्या आहारात सात्विक जेवण आहे. तेलाचा वापर कमी असलेले प्रदार्थाचे सेवन करावे. प्रत्येकांनी नियमित व्यायाम करावा. दररोज ४० मिनीटे चालण्याचा व्यायम करावा. त्यामुळे हृदयरोग टाळता येऊन शकते. सहसा उघडयावरील पदार्थ खाणे टाळावे, तसेच चटपटे पदार्थसुद्धा खाणे टाळावे, धुम्रपान, नशा, तंबाखू, दारु यांचे सेवन करु नये. हिरव्या भाज्या, फळ जास्त प्रमाणात खाव्यात, तेल, तूप, मीठ आणि मसालेयुक्त पदार्थ कमी प्रमाणात खावे, वजनावरही नियंत्रण असले पाहिजे.

Web Title: 20% of people are at risk of heart disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.