नागभीड तालुक्यात २० शाळा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:29 AM2021-07-27T04:29:44+5:302021-07-27T04:29:44+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील वर्ग ८ ते १२ पर्यंतच्या शाळा सुरू ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील वर्ग ८ ते १२ पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. या निर्देशानुसार या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. नागभीड तालुक्यात सुरू झालेल्या या शाळांची संख्या सध्या तरी २० आहे.
वर्ग ८ ते १२ पर्यंत शिक्षण देणाऱ्या नागभीड तालुक्यात एकूण ३६ शाळा असून या शाळांमध्ये ४ हजार ४९१ विद्यार्थ्यांची नोंद आहे. मात्र, नगरपालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्यासंदर्भात संभ्रम असल्याने नगरपालिका क्षेत्रातील या शाळा अद्यापही सुरू करण्यात आल्या नाहीत. मात्र, तालुक्याच्या ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सुरू करण्यात आलेल्या या २० शाळांमध्ये १ हजार ४३८ विद्यार्थ्यांची नोंद आहे. यात वर्ग ८ मध्ये ४११, वर्ग ९ मध्ये ३७३, वर्ग १० मध्ये ४९२ आणि वर्ग १२ मध्ये १६२ विद्यार्थ्यांची उपस्थिती असल्याची माहिती आहे. या विद्यार्थ्यांना २०२ शिक्षक विद्यार्जन करीत आहे.
बॉक्स
नागभीड येथील शाळा बंद
वर्ग ८ ते १२ च्या ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यात आल्या असल्या तरी नगरपालिका क्षेत्रातील शाळा सुरू कराव्यात की नाही याबाबत संभ्रम असल्याने नागभीड येथील शाळा सुरू करण्यात आलेल्या नाहीत. नागभीड येथे ८ ते १२ व्या वर्गापर्यंत शिक्षण देणाऱ्या पाच शाळा आहेत.