शिबिरात २०० दिव्यांगांची नोंद

By admin | Published: October 14, 2016 01:19 AM2016-10-14T01:19:28+5:302016-10-14T01:19:28+5:30

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या विशेष पुढाकारातून गुरूवारी दिव्यांग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

200 Divya's record in the camp | शिबिरात २०० दिव्यांगांची नोंद

शिबिरात २०० दिव्यांगांची नोंद

Next

विद्यार्थ्यांची तपासणी : कृत्रिम अवयव वाटप करणार
चंद्रपूर : केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या विशेष पुढाकारातून गुरूवारी दिव्यांग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात शेकडो दिव्यांग व्यक्तींनी लाभ घेतला.
या शिबिरामध्ये सुमारे २०० दिव्यांगांची नोंदणी झाली असून पात्र ठरलेल्या दिव्यांगांना त्यांना उपयुक्त असलेल्या साहित्य लवकरच उपलब्ध केले जाणार आहे. जिल्हा शासकीय समन्वय समिती आणि जिल्हा आरोग्य विभागाच्या सौजन्याने पार पडलेल्या या शिबिरात आ. नाना शामकुळे, महापौर राखी कंचर्लावार, भाजपा नेते विजय राऊत, उपमहापौर वसंत देशमुख, भाजपा गटनेते अनिल फुलझेले, जि.प. सभापती देवराव भोंगळे, भाजपा जिल्हा सचिव राहुल सराफ, सुभाष कासनगोट्टूवार, नगरसेवक तुषार सोम, मोहन चौधरी, धनंजय हूड, नामदेव डाहुले, नगरसेवक रवींद्र गुरूनुले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोगुलवार, समाज कल्याण अधिकारी आत्राम, प्रमोद शास्त्रकार, रमेश भुते, रवी जोगी, संदीप आगलावे, राजेंद्र तिवारी, अशोक सोनी, पूनम तिवारी, नगरसेविका ललिता गराट, सुषमा नागोसे, वनश्री गेडाम, माया उईके, स्वरूपा आसरानी, गणेश गेडाम, विकास खटी, जितेंद्र धोटे, सुनिल डोंगरे, सज्जाद अली, संजय खनके, राजू घरोटे, डॉ. भलमे, श्रीकांत भोयर, तेजा सिंह, संदीप देशपांडे, राजू येले, राजेंद्र कागदेलवार, बलवंत मून, संजय मिसलवार, प्रभाताई गुडघे, जितू शर्मा, संजय तिवारी, श्याम आगदारी, राजू कामपेल्ली, विनोद शेरकी, तुषार मोहुर्ले, काजू जोशी, सागर येळणे, किरण बांधुरकर, शशीधर तिवारी आदी उपस्थित होते.
या शिबिरास अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय धिवरे व जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्रर सिंह यांनी भेट देवून व्यवस्थेची विशेष पाहणी केली. शिबिरात अनेक दिव्यांग शाळांच्या विद्यार्थ्यांचीही तपासणी करण्यात आली.
या शिबिराच्या यशस्वीतेकरिता जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य विभागाअंतर्गत वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: 200 Divya's record in the camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.