२०२०-२१ सत्र झिरो शिक्षण क्षेत्र घोषित करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:38 AM2021-02-27T04:38:06+5:302021-02-27T04:38:06+5:30

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे यावर्षी अद्यापही पाहिजे तसे शैक्षणिक सत्र सुरु झाले नाही. त्यातच पुन्हा कोरना रुग्ण संख्या वाढत ...

2020-21 session should be declared as zero education zone | २०२०-२१ सत्र झिरो शिक्षण क्षेत्र घोषित करावे

२०२०-२१ सत्र झिरो शिक्षण क्षेत्र घोषित करावे

Next

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे यावर्षी अद्यापही पाहिजे तसे शैक्षणिक सत्र सुरु झाले नाही. त्यातच पुन्हा कोरना रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे यावर्षी झिरो शिक्षण क्षेत्र घोषित करून सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश द्यावा, तसेच यावर्षीची शैक्षणिक फी वसुल न करता पालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी येथील येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश समरित यांच्यासह पालकांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यासह, शालेय शिक्षणमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

मागील वर्षभरापासून देशात कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे लाॅकडाऊन करण्यात आले. आता पुन्हा रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे शैक्षणिक सत्र धोक्यात आले आहे. यावर्षीची परिस्थिती बघता २०२०-२१ सत्राला झिरो शिक्षण क्षेत्र घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेषम्हणजे, आता यावर्षीचे शैक्षणिक सत्र संपत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत बोलाविणे धोकादायक ठरू शकते. विद्यार्थ्यांचे ऑफलाईन, ऑनलाईन शिक्षण बंद करून ११वी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश द्यावे, तसेच दहावी बोर्डाची परीक्षा ऑफलाईन घ्यावी. शिक्षण संंस्थामार्फत पालकांना फी भरण्यासाठी बाध्य केले जात आहे.हा प्रकार बंद करावा, पुढच्या वर्गात विद्यार्थ्यांना प्र‌वेश दिल्यास फी वसुलीचा प्रकार बंद होईल,असेही निवेदनात म्हटले आहे.

Web Title: 2020-21 session should be declared as zero education zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.