२०२५ पर्यंत शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 10:26 PM2019-07-01T22:26:35+5:302019-07-01T22:27:10+5:30

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. २०२५ पर्यंत जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकºयांच्या शेतामध्ये पाटाद्वारे, विहिरीद्वारे वा अन्य कोणत्याही माध्यमातून मुबलक पाणी पोहोचेल, अशी व्यवस्था निर्माण करण्याकडे आपण वाटचाल सुरू केली असून २०२५ पर्यंत प्रत्येकाच्या बांधापर्यंत पाणी नेण्याची आपला प्रयत्न आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.

By 2025 the farmers will give irrigation water to the farmers | २०२५ पर्यंत शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी देणार

२०२५ पर्यंत शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी देणार

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : घाटकुळ-मुधोली रस्त्यावरील पुलाचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. २०२५ पर्यंत जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकºयांच्या शेतामध्ये पाटाद्वारे, विहिरीद्वारे वा अन्य कोणत्याही माध्यमातून मुबलक पाणी पोहोचेल, अशी व्यवस्था निर्माण करण्याकडे आपण वाटचाल सुरू केली असून २०२५ पर्यंत प्रत्येकाच्या बांधापर्यंत पाणी नेण्याची आपला प्रयत्न आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.
घाटकुळ व परिसरातील नागरिकांची गेल्या २५ वर्षांपासूनची पुलाची प्रलंबित मागणी पूर्ण झाल्याचा या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला मनापासून आनंद होत असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याला जोडणाºया घाटकुळ-मुधोली रस्त्यावरील ५० कोटी रू. किंमतीच्या मोठया पुलाचा लोकार्पण सोहळा तसेच महाराष्ट्र ग्राम परिवर्तन अभियान ग्रामपंचायत घाटकुळ अंतर्गत आयोजित ग्रामसंवाद कार्यक्रम ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, खासदार अशोक नेते, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.देवराव होळी प्रामुख्याने उपस्थित होते.
बल्लारपूर मूल पोंभूर्णा मतदार संघाने राज्याच्या अर्थमंत्री म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी दिली त्याचे सोने करत आतापर्यंत जिल्ह्याला पाच हजार कोटीपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून देऊन विकासाची गंगा जिल्ह्यात आणली, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले.
आयएसओ नामांकन
कार्यक्रमादरम्यान घाटकुळच्या अंगणवाडी, शाळा व ग्रामपंचायतीला एकाच वर्षी आयएसओ नामांकन प्राप्त झालेले असून त्याचे प्रमाणपत्र पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उपस्थित अंगणवाडी प्रमुख, शाळा प्रशासन तसेच ग्रामपंचायत प्रशासनाला प्रदान करण्यात आले. याप्रसंगी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी गावकऱ्यांचे कौतुक केले.
सिंचनाच्या प्रश्नाला नेहमीच अग्रक्रम
सिंचनाच्या प्रश्नाला आपण नेहमीच अग्रक्रम दिला असल्याचे सांगत ना. मुनगंटीवार म्हणाले, पळसगाव-आमडी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून १० गावातील दोन हजार ४६२ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील वैनगंगा तीरावरील शेतकºयांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बांधलेला चीचडोह प्रकल्प, २३ कोटी रू. किंमतीची चिचाळा व लगतच्या सहा गावांमध्ये पाईपलाईनद्वारे सिंचनाची सुविधा आदी कामे पूर्ण झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

Web Title: By 2025 the farmers will give irrigation water to the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.