२०,४४८ बाधित झाले कोरोनातून बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:52 AM2020-12-17T04:52:49+5:302020-12-17T04:52:49+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यात ९८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर १०० कोरोनाबाधित रुग्णांची ...

20,448 infected from Corona | २०,४४८ बाधित झाले कोरोनातून बरे

२०,४४८ बाधित झाले कोरोनातून बरे

Next

चंद्रपूर : जिल्ह्यात ९८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर १०० कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २१ हजार ५५७ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २० हजार ४४८ झाली आहे. सध्या ७७० बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ६२ हजार १४२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख ३८ हजार ५६० नमुने निगेटिव्ह आले आहेत.

बुधवारी मृत झालेल्यांमध्ये नागभीड तालुक्यातील ६० वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३३९ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३१२, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १६, यवतमाळ सात, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

बुधवारी बाधित आलेल्या १०० रुग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रातील ४९, चंद्रपूर तालुक्यातील तीन, बल्लारपूर तीन, भद्रावती ११, ब्रम्हपुरी चार, नागभीड एक, सिंदेवाही चार, मूल आठ, सावली एक, राजुरा पाच, चिमूर चार, वरोरा पाच व कोरपना येथील दोन रुग्णांचा समावेश आहे. नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघताना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे. तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: 20,448 infected from Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.