घुग्घूसमध्ये दोन दिवसांत २१ टिल्लूपंप जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:29 AM2021-05-20T04:29:48+5:302021-05-20T04:29:48+5:30
फोटो : जप्त केलेले टिल्लू पंप घुग्घुस : सध्या घुग्घुसमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नळाला पुरेसे पाणी मिळत नाही. ...
फोटो : जप्त केलेले टिल्लू पंप
घुग्घुस : सध्या घुग्घुसमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नळाला पुरेसे पाणी मिळत नाही. अशा वेळी अनेक जण टिल्लू पंपाने पाण्याचा उपसा करीत असल्याने अनेक नळधारकांना पाणी मिळत नाही. टिल्लू पंपाचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अनेकांनी घुग्घुस नगर परिषदेचे प्रशासक तहसीलदार नीलेश गौड यांच्याकडे केली. त्या तक्रारीची तत्काळ दखल घेत दोन दिवसांत २१ टिल्लू पंप जप्तीची कारवाई केली. त्यामुुळे टिल्लू पंपाचा
वापर करणाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.
घुग्घुस नगर परिषदेचे पाणीपुरवठा अभियंता अमर लाड यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेचे पाणीपुरवठा कर्मचारी हरिभाऊ जोगी, अशोक रसाळ, सचिन चिकणकर, सचिन माशीरकर व लक्ष्मीबाई येरलावार यांनी ही जप्तीची कारवाई केली.