शंकरपूरच्या सरपंचपदी २१ वर्षीय साईश वारजूकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:30 AM2021-02-11T04:30:27+5:302021-02-11T04:30:27+5:30
शंकरपूर जिल्हा परिषद अंतर्गत चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. तीन ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता स्थापन झाली तर शंकरपूर या एका ग्रामपंचायतीवर ...
शंकरपूर जिल्हा परिषद अंतर्गत चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. तीन ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता स्थापन झाली तर शंकरपूर या एका ग्रामपंचायतीवर काँग्रेसने झेंडा फडकविला. शंकरपूर ग्रामपंचायतीवर साईश वारजूकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. साईश वारजूकर यांचे वय २१ वर्षे ५ महिने इतके आहे. त्यांनी एमबीए पदवी घेतलेली आहे, तर उपसरपंचपदी अशोक चौधरी यांची निवड करण्यात आलेली आहे. मॉडेल ग्रामपंचायत म्हणून समजल्या जाणाऱ्या शंकरपूर ग्रामपंचायतीवर मागील १५ वर्षांपासून काँग्रेसकडे एकहाती सत्ता आहे. काँग्रेस गटाचे १३ उमेदवार निवडून आले, तर भाजपा गटाचे दोन उमेदवार निवडून आलेले आहे. पांजरेपार ग्रामपंचायतीमध्ये भाजपच्या वैशाली बंगाळे, उपसरपंचपदी राहुल गुरपुडे, चिंचाला शास्त्री येथे भाजपचे अरविंद राऊत, उपसरपंचपदी विनायक वासनिक, खैरी येथे भाजपचे वसंता नरुले, उपसरपंचपदी प्रीती गजभे यांची निवड झाली आहे.