अभियंताच निघाला चोर, एटीएममधून २२ लाख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 12:40 AM2019-09-03T00:40:29+5:302019-09-03T00:40:51+5:30
एटीएम फोडून २२ लाख ८४ हजार १०० हजार लंपास केल्याच्या तक्रारीवरून भद्रावती ठाण्यात गुन्हा झाला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाला सुरूवात केली. एटीएम मशीनमधून कसे पैसे काढले याचा कसून तपास केला. चंद्रपूर व गडचिरोली क्षेत्रातील एटीएमचे मेन्टेन्स करणारा एनसीआर कंपनीचा अभियंता नितीन तुळशिराम गेडाम याला बोलावून चौकशी सुरू केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भद्रावती शहरातील रेल्वे स्टेशन मार्ग मंजुषा ले - आऊटमधील हिताची कंपनीच्या एटीएममधून २२ लाख ८४ हजार १०० हजार लंपास करणाऱ्यांमध्ये अन्य दोघांसोबत अभियंताचा सहभाग असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासातून उघडकीस आले. अभियंता नितीन तुळशिराम गेडाम (३६), रा. गोपालपुरी, कॅश लोडर मंगेश सुखदेव धाबर्डे (३२), गोपाल भाऊराव इंगोले (३६) दोघहीे रा. बालाजी वार्ड गोपालपुरी चंद्रपूर अशी आरोपींची नावे आहेत.
एटीएम फोडून २२ लाख ८४ हजार १०० हजार लंपास केल्याच्या तक्रारीवरून भद्रावती ठाण्यात गुन्हा झाला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाला सुरूवात केली. एटीएम मशीनमधून कसे पैसे काढले याचा कसून तपास केला. चंद्रपूर व गडचिरोली क्षेत्रातील एटीएमचे मेन्टेन्स करणारा एनसीआर कंपनीचा अभियंता नितीन तुळशिराम गेडाम याला बोलावून चौकशी सुरू केली. कॅश लोडींग करणाºया सीएमएस कंपनीचा मंगेश सुखदेव धाबर्डे, गोपाल इंगोले यांची चौकशी केली असता सदर मशीन नादुरूस्त झाल्याने दुरूस्तीकरिता अभियंता नितीनला बोलावल्याचे समजले. एटीएममधील कॅश संपल्याने कॅश लोडरलाही कॉल दिले असता दुरूस्ती व कॅश लोडींगच्या नावाखाली तिघांनी मशीनमध्ये छेडछाड करून ४ आॅगस्ट २०१९ रोजी सकाळी १६ लाख रूपये आणि रात्री उर्वरित रक्कम असे एकूण २२ लाख ८४ हजार १०० रूपये व एटीएम सीपीयू चोरून नेल्याचे सिद्ध झाले. आरोपी अभियंता नितीन गेडाम रा. गोपालपुरी, कॅश लोडर मंगेश धाबर्डे, गोपाल इंगोले यांना रविवारी अटक केली. आरोपींकडून ८ लाख रूपये जप्त करण्यात आले. पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी, एसडीपीओ पांडे यांच्या एलसीबी पीआय ओमप्रकाश कोकाटे यांनी ही कारवाई केली.