विदर्भ राज्य आंदोलन समितीची २२ ला बैठक
By admin | Published: September 20, 2015 01:37 AM2015-09-20T01:37:21+5:302015-09-20T01:37:21+5:30
वेगळा विदर्भ आंदोलन गतिमान करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीची बैठक २२ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता...
चंद्रपूर : वेगळा विदर्भ आंदोलन गतिमान करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीची बैठक २२ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता दिनुजी भवन साईबाबा मंदिराच्या मागे सिव्हील लाईन चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी अॅड. वामनराव चटप, प्रा. डॉ. निवास खांदेवाले, माजी पोलीस अधिकारी पी.के. बी. चक्रवर्ती, अॅड. नंदा पराते, धनंजय धार्मिक, धर्मराज रेवतकर, राम नेवले, डॉ. रमेश गजबे, अरुण केदार, दिलीप नरवाडीया, डॉ. दीपक मुंंडे उपस्थित राहणार आहेत.
नागपूरच्या वीज विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयासमोर ३ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या आंदोेलनाची पुर्वतयारी, ९ आॅक्टोबर रोजी अकोलाच्या मुख्य अभियंता वीज वितरण कार्यालयासमोर आंदोलनाची पुर्वतयारी आणि २५ आॅक्टोबर रोजी वणी येथे कोयला रोकने आंदोलनाच्या कार्यक्रमाची पुर्वतयारी तसेच संगठनात्मक विचार करण्यात येणार आहे. तरी या बैठकीला विदर्भवादी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याची विनंती किशोर पोतनवार, मितीन भागवत, रमेश गोहणे, अंकुश वाघमारे, प्रा. अनिल ठाकूरवार, अॅड. जयश्री इंगळे, प्रभाकर दिवे, शेख मैकू शहाबुद्दीन, अशोक मुसळे, कवडू यनप्रेड्डीवार, विकी गुप्ताल अनिल अडूर, प्रा. चिकटे, अनिल दीकोंंडवार, कपिल इद्दे, दिवाकर माणुसमारे, गोपी मित्रा, नितीन बाकडे, योगेश जाफराबादी, गजू गेडाम, जीवन तोगरे, प्रमोद गेडाम, सुरज गावंडे यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)