२२ प्रवाशांच्या सक्तीमुळे बसस्थानकावर ताटकळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 05:00 AM2020-08-25T05:00:00+5:302020-08-25T05:00:47+5:30

ग्रामीण व शहरी भागात कोविड १९ चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. सहा महिन्यांपासून सर्व व्यवहार बंद असल्याने आर्थिक मंदीचे सावट आहे. प्रवाशांना ये-जासाठी राज्य परिवहन महामंडळाने २० आॅगस्टपासून बससेवा सुरू केली. मात्र एका बसमध्ये फक्त २२ प्रवासी नेण्याची मुभा दिल्याने प्रवाशांना ये-जा करण्यास अडचणी निर्माण झाल्या.

22 passengers stranded at bus stand | २२ प्रवाशांच्या सक्तीमुळे बसस्थानकावर ताटकळ

२२ प्रवाशांच्या सक्तीमुळे बसस्थानकावर ताटकळ

Next
ठळक मुद्देप्रवाशांमध्ये तीव्र संताप : प्रवाशी संख्या मर्यादित केल्याने हाल

राजू गेडाम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळ एका बसमध्ये फक्त २२ प्रवाशीच नेत आहे. त्यामुळे शेकडो प्रवाशांना बसस्थानकावर ताटकळत उभे राहावे लागत असल्याचे चित्र आहे.
ग्रामीण व शहरी भागात कोविड १९ चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. सहा महिन्यांपासून सर्व व्यवहार बंद असल्याने आर्थिक मंदीचे सावट आहे. प्रवाशांना ये-जासाठी राज्य परिवहन महामंडळाने २० आॅगस्टपासून बससेवा सुरू केली. मात्र एका बसमध्ये फक्त २२ प्रवासी नेण्याची मुभा दिल्याने प्रवाशांना ये-जा करण्यास अडचणी निर्माण झाल्या. गडचिरोलीवरून चंद्र्रपूरकडे जाणाऱ्या बसमध्ये गडचिरोली २२ प्रवाशी बसल्याने रस्त्यावरील नवेगाव, मुरखडा, व्याहाड, मोखाडा, चकपिरंजी, सावली, चिमढा, मूल, चिचपल्ली मार्गावर अनेक प्रवाशांना वाट बघावे लागत आहे. हीच स्थिती चंद्रपूरवरून ब्रह्मपुरीकडे जाणाºया बसची आहे. बसमध्ये एकदा २२ प्रवाशी बसले तर अन्य प्रवाश्यांची मोठी अडचण होत आहे.

बसेसची संख्या वाढवावी
राज्य परिवहन महामंडळाने बसची संख्या वाढविणे आवश्यक आहे. सध्या शेकडो नागरिक प्रवास करू लागले. त्यामुळे बसस्थानकावर आता गर्दी वाढत आहे. मात्र बसमध्ये २२ प्रवाशीच बसण्याची सक्ती आणि बसेसची संख्या कमी असल्याने दोन-तीन तास ताटकळत राहावे लागत आहे. राज्य परिवहन महामंडळाने बसेस वाढविण्याची मागणी प्रवाश्यांनी केली.

बससेवा सुरू करण्यात आली. २२ प्रवाशांची अट लादल्याने अनेकांना बसस्थानकावर ताटकळत राहावे लागते. नागरिकांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयाचा काहीही लाभ होताना दिसत नाही. प्रवाशी व बसेसची संख्या वाढविणे हाच पर्याय आहे.
- प्रशांत समर्थ, नगरसेवक न.प.मूल

२२ प्रवाशांची अट उपयोगाची नाही. ग्रामीण भागातून येण्याºया प्रवाशांची गर्दी वाढत आहे. बसेस कमी असल्याने बसस्थानकावर विनाकारण वेळ वाया जात आहे. राज्य परिवहन विभागाने आपल्या निर्णयात बदल करण्याची गरज आहे.
- मयुरी नैताम, सिंतळा ता. मूल

Web Title: 22 passengers stranded at bus stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.