२२ हजार शौचालयांची होणार जिल्ह्यात निर्मिती

By admin | Published: November 18, 2014 10:51 PM2014-11-18T22:51:41+5:302014-11-18T22:51:41+5:30

देशात स्वच्छतेसाठी पंतप्रधानांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत समाजातील सर्व घटक कामाला लागले आहे. आजही गावागावांत पाहिजे तशी स्वच्छता झाली नाही. अस्वच्छतेमुळे अनेक प्रकारच्या

22 thousand toilets will be made in the district | २२ हजार शौचालयांची होणार जिल्ह्यात निर्मिती

२२ हजार शौचालयांची होणार जिल्ह्यात निर्मिती

Next

जागतिक शौचालय दिन : शौचालय बांधकाम करून वापर केल्यास सुटणार आरोग्याच्या समस्या
साईनाथ कुचनकार - चंद्रपूर
देशात स्वच्छतेसाठी पंतप्रधानांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत समाजातील सर्व घटक कामाला लागले आहे. आजही गावागावांत पाहिजे तशी स्वच्छता झाली नाही. अस्वच्छतेमुळे अनेक प्रकारच्या रोगांचा प्रादूर्भाव होतो. तो टाळण्यासाठी स्वच्छतेला विशेष महत्त्व आहे. उघड्यावर शौचास बसल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादूभाव होतो. प्र्रत्येकांनी शौचालयाचा वापर केल्यास विविध रोगांपासून मुक्ती मिळू शकते. मात्र त्यासाठी स्वत:ची मानसिकता असणे गरजेचे आहे.
यावर्षी जिल्हा परिषदेने जिल्ह्यात तब्बल २२ हजार ७७ शौचालय बांधकामाचे उद्दीष्ट हातात घेतले आहे. यातील ६ हजार शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून त्याचा वापरही नागरिकांनी सुरु केला आहे. शासनस्तरावर शौचालय बांधकाम आणि वापरासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र आजही काही नागरिक शौचालयाच्या बांधकाम आणि वापराबाबत उदासिनता दाखवितात. २०१३-१४ या वर्षामध्ये जिल्ह्यात १४ ग्रामपंचायतींनी निर्मल ग्राम पुरस्काराकरिता प्रस्ताव सादर केले आहे. मात्र ही संख्या फारच तोकडी आहे. संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यात यावर्षी एपीलसाठी २ हजार ५९३, बीपीएल २ हजार ३६५, विद्यालय १ हजार ५८६, तर अंगणवाडी केंद्रामध्ये २ हजार २७७ शौचालय बांधण्यात येणार आहे.
ग्रामीण तसेच शहरी भागातील काही परिसरामध्ये शौचालयाची पुरेशी सुविधा नसल्यामुळे नागरिक गावातील रस्त्याच्या कडेला शौचास बसतात. त्यामुळे गावाभोवती, विष्ठा साचते. दररोज कुजणाऱ्या या विष्ठेमधील घातक वायू बाहेर पडतात व ते गावात पसरतात. त्यामुळे त्याचा मानवी आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
पशु-पशी व मानवी विष्ठा रोगजंतुच्या अस्तीत्वामुळे अत्यंत घातक असते. त्यामुळे ती ताडबतोड जमिनीमध्ये गाढल्याशिवाय पर्याय नाही. मात्र असे न केल्यामुळे रोगांना आमंत्रण मिळते. यामुळेच शौचालयाचा वापर केल्यास यापासून सुटका मिळू शकते. मानवी विष्ठेमध्ये जंताची अंडी तसेच इतर रोगजंतू असतात. ही अंडी शौचाला गेलेल्या माणसाच्या पायाबरोबर, शौचालयाला नेलेल्या पाण्याच्या तांब्याबरोबर तसेच मातीत खेळणाऱ्या मुलांच्या हातापायाला लागतात. लागलेल्या मातीबरोबर पिण्याच्या पाण्यात व अन्नात मिसळतात व ते पोटात गेल्यामुळे मुलांना जंत होतात. त्यामुळे नाहक औषधोपचार करावा लागतो. शौचास बाहेर जाण्यामुळे अंधारात पाय घसरून पडणे, हात पाय मोडणे डोक्याला मार लागने असे अनेक प्रकार घडतात. त्यामुळे हे टाळण्यासाठी शौचालयाचा वापर करणे अत्यावश्यक आहे. महिलांना दिवसा शौचास जाणे सुरक्षित वाटत नाही. त्यामुळे त्या पहाटे किंवा रात्री अंधारात शौचास जाणे पसंत करतात. त्यामुळे बराचकाळ विष्ठा पोटात साठून राहते व त्यातील जंत, जिवाणू, विषाणू आतड्यावर हल्ला करतात. त्यामुळे पोटात दुुखण्यास सुरुवात होते. अपचन होते. विष्ठा पोटात साठण्याने महिलांना नेहमी पोटाचे आजारामध्ये वाढ होते.
वाशिम जिल्ह्यातील महिलेने शौचालय बांधकामासाठी स्वत:चे मंगळसूत्र विकले. तिच्यासारखीच जिद्द प्रत्येक महिलांनी केली तर, जिल्हा निर्मल होणार हे मात्र नक्की.

Web Title: 22 thousand toilets will be made in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.