२२० गरजूंच्या चेहऱ्यांवर हास्य फुलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:51 AM2021-03-04T04:51:57+5:302021-03-04T04:51:57+5:30
चंद्रपूर : निराधार आणि गरजूंना जीवन जगताना त्रास होऊ नये, त्यांना फुल नाही तर फुलाची पाकळी मिळावी या उदात्त ...
चंद्रपूर : निराधार आणि गरजूंना जीवन जगताना त्रास होऊ नये, त्यांना फुल नाही तर फुलाची पाकळी मिळावी या उदात्त हेतून शासनाने सुरु केलेल्या विविध योजनांतून दर महिन्यात आर्थिक मदत केली जाते. कोरोना संकटाच्या काळात अनेकांचे बेहाल झाले, अशा वेळी या योजनांमधून मिळणाऱ्या लाभातून गरजा भागविणे सोपे झाले. चंद्रपूर तालुका प्रशासनाने मागील महिनाभरात विविध २२० प्रकरणे मंजूर केली असून लाभार्थ्यांना चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. यानंतरही अनेक प्रकरण निकाली काढण्याचा मानस चंद्रपूर तालुका प्रशासनाने व्यक्त केला आहे.
चंद्रपूर पंचायत समिती क्षेत्रांतर्गत संजय गांधी योजनेची सभा नुकतीच पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लहामगे होते. यावेळी अनुताई दहेगावकर, सुरज कन्नुर, प्रमोद देशमुख निरज बोडे, शरद मानकर यांच्यासह तहसीलदार निलेश गौंड, नायब तहसीलदार राजू धांडे यांची उपस्थिती होती. यावेळी दाखल केलेल्या अर्जाचा विचार करून लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये श्रावणबाळ योजना ११५, संजय गांधी योजना ७८, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना १४, इंदिरा गांधी विधवा योजना १२,दिव्यांग योजना १ असे एकूण २२० लाभार्थ्यांचे प्रकरण मंजूर करण्यात आले.
बाॅक्स
या योजनेतून मिळणार लाभ
श्रावणबाळ योजना ११५
संजय गांधी योजना ७८
इंगायो वृद्धापकाळ योजना १४
इंगायो विधवा योजना १२
इंगायो दिव्यांग योजना ०१
एकूण २२०
कोट
शासनाच्या गरजू तसेच निराधारांसाठी विविध योजना आहे. या योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मानधन दिले जाते. नुकत्याच पार पडलेल्या बैठकीमध्ये २२० लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले. त्यामुळे यांना दर महिन्यात आता मानधन देण्यात येणार आहे.
-राजु धांडे
नायब तहसीलदार,संजय गांधी योजना, चंद्रपूर