२३ कोरोनामुक्त , १७ नव्यांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:26 AM2020-12-22T04:26:51+5:302020-12-22T04:26:51+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यात सोमवारी २३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर १७ कोरोनाबाधित ...
चंद्रपूर : जिल्ह्यात सोमवारी २३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर १७ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २१ हजार ८६९ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २० हजार ८३२ झाली आहे. सध्या ६८४ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ६५ हजार २४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख ४१ हजार १५१ नमुने निगेटीव्ह आले आहेत.
सोमवारी मृत झालेल्यांमध्ये अभ्यंकर वार्ड, वरोरा येथील ५७ वर्षीय पुरूष व शेगाव, चंद्रपूर येथील ७० वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३५३ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३२६, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १६, यवतमाळ सात, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
सोमवारी बाधीत आलेल्या १७ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील सात, चंद्रपूर तालुक्यातील एक, बल्लारपूर एक, ब्रम्हपुरी एक, मूल पाच, कोरपना एक व इतर ठिकाणच्या एक रुग्णाचा समावेश आहे.
नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.