संजय गांधी निराधार योजनेची २३३ प्रकरणे मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:25 AM2021-08-01T04:25:58+5:302021-08-01T04:25:58+5:30
या सभेत योजनांबाबत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी विशेष शिबिर आयोजित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. संजय गांधी निराधार योजना ...
या सभेत योजनांबाबत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी विशेष शिबिर आयोजित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ वृद्धापकाळ योजनेत ज्या लाभार्थ्यांनी अर्ज सादर केलेले आहे, परंतु या प्रकरणात ज्या काही त्रुटी आहेत, त्या त्रुटी तत्काळ दुरुस्त करून विशेष सभा आयोजित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार यांनी जास्तीत जास्त लाभार्थ्यांना फायदा होण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असल्याचे सांगत योजनेसंबंधाने काही अडचणी असल्यास तहसील कार्यालयाचे कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून कागदपत्रांची पूर्तता करण्यात यावी व दलालापासून सावध राहावे, असेही आवाहन केले. सभेला नायब तहसीलदार ठाकरे, यशवंत पवार, न.प.मूलचे प्रशासकीय अधिकारी तुषार शिंदे, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य दशरथ वाकुडकर, संजय गेडाम, रूपाली संतोषवार, गंगाधर कुनघाडकर, अर्चना चावरे उपस्थित होते.