राजुरा येथे २३.५४ लाखांचा दारुसाठा नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 05:00 AM2020-05-08T05:00:00+5:302020-05-08T05:00:41+5:30
शासनाने दारुबंदी केली आहे. मात्र राजुरा तालुक्यात अवैध मार्गाने दारुची विक्री सुरु आहे. त्यामुळे राजुरा पोलिसांनी मागील वर्षभरात विविध प्रकारची मोहिम राबवली. यामध्ये अनेक दारुविक्रेत्यांना अटक केली. गुरुवारी सकाळी मागील वर्षभरात केलेल्या ११२ कारवाईतील सर्व दारुसाठा नष्ट केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : पोलिसांनी मागील वर्षभरात ११२ कारवाईत केलेला २३ लाख ५४ हजार १७० रुपयांचा दारुसाठा राजस्व विभागाच्या परवानगीने नष्ट करण्यात आला.
शासनाने दारुबंदी केली आहे. मात्र राजुरा तालुक्यात अवैध मार्गाने दारुची विक्री सुरु आहे. त्यामुळे राजुरा पोलिसांनी मागील वर्षभरात विविध प्रकारची मोहिम राबवली. यामध्ये अनेक दारुविक्रेत्यांना अटक केली. गुरुवारी सकाळी मागील वर्षभरात केलेल्या ११२ कारवाईतील सर्व दारुसाठा नष्ट केला.
लॉकडाऊनमुळे १०० रुपयाला भेटणारी मोहफुलाची दारु हजार रुपयात विक्री होत असताना ऐवढी मोठी दारु नष्ट केल्याने चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे दारुसाठ नष्ट करताना गुप्तता पाळण्यात आली होती.
सिंदेवाहीत मोहा दारुसाठा जप्त
सिंदेवाही : पोलिसांनी हेटी वॉर्डात धाड टाकून २० लिटर हातभट्टी मोहफुलाची दारु जप्त केली. याप्रकरणी अशोक रामाजी पाकेवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील महिला पोलीस कर्मचारी अर्चना सिडाम व योगीता पराते यांना हेटी वॉर्डातील अशोक रामाजी पाकेवार यांच्या घरामागे दारुविक्री सुरु आहे. या माहितीच्या आधारावर धाड टाकली. यावेळी एका प्लास्टि ड्रममधून २० लिटर हातभट्टी दारु व साहित्य असा एकूण ६५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सपोनि रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली अर्चना सिडाम व योगीता पराते यांनी केली. अधिक तपास सुरू आहे.