शेगाव परिसरात २४ तास थ्री फेज विद्युत पुरवठा द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:55 AM2020-12-11T04:55:30+5:302020-12-11T04:55:30+5:30
सोयाबीन पीक अत्यल्प हाती आले. कापूस पिकांनी दोनदा वेचनी झाल्यानंतर बोंड अळीने कपाशीचे पीक उद्ध्वस्त केले. दुबार पीक घेण्याची ...
सोयाबीन पीक अत्यल्प हाती आले. कापूस पिकांनी दोनदा वेचनी झाल्यानंतर बोंड अळीने कपाशीचे पीक उद्ध्वस्त केले. दुबार पीक घेण्याची तयारी शेतकऱ्यांनी सुरु केली आहे. परंतु, आठवड्यातून तीन दिवस रात्री तर तीन दिवस दिवसा थ्री फेज वीज पुरवठा मिळत आहे. रात्री वन्यप्राणी व सरपटणाऱ्या प्राण्याचा मोठा हौदोस असल्याने रात्री शेतात पाणी देण्याकरिता शेतकरी धजावीत नाही. त्यामुळे दिवसा थ्री फेज पुरवठा केवळ तीन दिवस मिळत असल्याने सिंचन करता येत नाही. अशा संकटात शेगाव परिसरातील शेतकरी सापडले आहे. सध्या चारगाव धरणात २८ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. शेतीसाठी १० ते १५ दिवस पाणी मिळणार आहे. आठवड्यात थ्री फेज वीज पुरवठ्यामुळे दिवसा तीनच दिवस सिंचन करता येते. परंतु, या तीन दिवसात शेतात सिंचन करता येणार नाही. त्यामुळे शेती पडीक राहण्याची भीती आहे. त्यामुळे येत्या १५ दिवस शेगाव परिसरात २४ तास थ्री फेज वीज पुरवठा देण्याची मागणी बाजार समिती सभापती राजेंद्र चिकटे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.