एका महिन्यात २४ पशुधन वाघांचे भक्ष्य

By admin | Published: October 14, 2016 01:27 AM2016-10-14T01:27:26+5:302016-10-14T01:27:26+5:30

ब्रह्मपुरी विभागाअंतर्गत येत असलेल्या एफडीसीएमच्या पाथरी वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वनाचे क्षेत्र आहे.

24 Livestock Tigers in a month | एका महिन्यात २४ पशुधन वाघांचे भक्ष्य

एका महिन्यात २४ पशुधन वाघांचे भक्ष्य

Next

एफडीसीएम पाथरी वनपरिक्षेत्रातील घटना : वाढीव नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत
दिलीप फुलबांधे  गेवरा
ब्रह्मपुरी विभागाअंतर्गत येत असलेल्या एफडीसीएमच्या पाथरी वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वनाचे क्षेत्र आहे. दिवसेंदिवस वाघाचे वास्तव्यही वाढत आहेत. मागील सप्टेंबर-२०१६ मध्ये या परिक्षेत्रातील जवळपासच्या गावातील शेतकऱ्यांचे २४ पशुधन वाघांनी फस्त केले आहे.
उसणवार चक येथील काशिनाथ वाकडे यांचा बैल जगदीश वाकडे यांचा बैल, उसरपार तुकुम येथील नथ्थु घरत यांचा बैल, मनोहर वाकडे यांचा बैल, मोहन घोडमारे यांची म्हैस, सावंगी चक येथील तुकाराम मडावी यांचा बैल, विरखल येथील त्र्यंबक सदाशिव मेश्राम व देवाजी गंडाटे यांचा बैल, अंतरगाव येथील जगन उंदिरवाडे यांचा बैल, मेहा बुज. येथील विलास भरडकर यांचा बैल, लिलाबाई कोलते यांचा बैल, मांगली चक येथील तुकाराम मडावी यांचा बैल, पाथरी येथील तुळशीराम जाधव यांची बकरी, मारोती नेवारे यांचा बैल, राघोजी मेश्राम यांची गाय, नथ्थू घरत यांचा बैल, शरद सोनवाने यांचा बैल, रेवन सुरपाम यांचा बैल, संजय मडावी यांचा बैल, देवराव सोनकर यांचा बैल, बेलगाव येथील दिवाकर कांबळे यांचा बैल, नवेगाव तुकूम काशिनाथ शेंडे यांचा बैल असे एकूण २४ पशुधन वनपरिसरातील वाघांनी फस्त केल्याने जवळपास या शेतकऱ्यांचे पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले आहे. सध्या स्थितीत वाघाच्या हल्ल्यात मृत जनावरांना वन विभागाने केवळ १५ हजार रुपयापर्यंतची तरतूद केली आहे. परंतु शेतकऱ्यांना पशुधनाच्या किंमती त्याहीपेक्षा अधिक असल्याने अल्प मोबदल्यामुळे फार मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. पाथरी वनपरिक्षेत्रातील केवळ १० गावातील २४ पशुधन वाघाचे भक्ष्य झाले. परंतु वनविकास महामंडळाच्यापेक्षा जास्त वन पाथरी उपक्षेत्राचा येतो. त्यामधील आकडेवारी यापेक्षाही मोठी आहे. त्यामुळे तुटपुंज्या नुकसान भरपाईमुळे शेतकऱ्यांची फार मोठे नुकसान होत असल्याचे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. राज्याचे वनमंत्र्यांनी केलेली घोषणा मृत बैलास २५ हजार रुपये ही सरसकट मदत तात्काळ अध्यादेश काढुन या शेतकऱ्यांना नवीन दराप्रमाणे द्यावी, अशी मागणी होत आहे.

आदेश पोहोचला नाही
वाघांच्या हल्ल्यातील मृत पशुधन मालकाला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकसान भरपाई म्हणून २५ हजार रुपये घोषणा केली आहे. परंतु पाथरी वनपरिक्षेत्र व वनविभागातील वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या पशुधनाचे आकडेवारी लक्षात घेता संबंधीत विभागाकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळण्यासाठी माहिती घेतली असता मंत्र्यानी केवळ घोषणा केलेली आहे. मात्र तसा अध्यादेश अजूनपर्यंत वन विभाग किंवा वनविकास महामंडळाकडे पोहचला नसल्याची माहिती प्राप्त झाली.

Web Title: 24 Livestock Tigers in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.