रूग्णाच्या संपर्कातील २४ नमुने निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 05:00 AM2020-05-06T05:00:00+5:302020-05-06T05:01:03+5:30
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात सध्या एकच पॉझिटिव्ह रूग्ण आहे. या रूग्णाच्या सानिध्यात आलेल्या कुटुंबातील सदस्य तसेच परिसरातील अन्य व्यक्ती व सदर रूग्ण काम करत असलेल्या अपार्टमेंटमधील पाठविण्यात आलेल्या एकत्रित ४४ पैकी २४ नागरिकांच्या स्वॅब अहवाल निगेटीव्ह आला आहे. यामध्येच रूग्णाच्या मुलाचा अहवालाचाही समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात आतापर्यंत केवळ एकच रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह असून या रूग्णाला कोविड १९ शिवाय अन्य आजाराच्या विशेष तपासणीकरिता मंगळवारी जिल्हा प्रशासनाकडून सायंकाळी नागपुरात हलविण्यात आले आहे. रूग्णाच्या संपर्कातील ४४ व्यक्तींचे स्वॅब नमुने नागपूर येथील कोरोना तपासणी प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यापैकी २४ नमुने निगेटिव्ह तर सद्यस्थितीत ३५ जणांच्या अहवालाची प्रतीक्ष आहे. विशेष म्हणजे रूग्णाच्या मुलाचाही अहवाल निगेटीव्ह आहे. यापूर्वी पत्नी व मुलीचा अहवाल निगेटीव्ह आला होता.
जिल्ह्यामध्ये मंगळवारी सकाळी ९ वाजता विजयवाडा येथून आंध्र प्रदेशात अडकलेल्या १२१२ मिरची तोड मजुरांना विशेष रेल्वेने चंद्रपुरात आणण्यात आले. सर्व मजुरांना आपापल्या गावी पोहोचवण्यात आले असून होम क्वारंन्टाइन करण्यात आले आहे. पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊनची परिस्थिती जैसे-थे आहे. बाहेरून जिल्ह्यात आलेल्या प्रत्येक मजुराला १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात सध्या एकच पॉझिटिव्ह रूग्ण आहे. या रूग्णाच्या सानिध्यात आलेल्या कुटुंबातील सदस्य तसेच परिसरातील अन्य व्यक्ती व सदर रूग्ण काम करत असलेल्या अपार्टमेंटमधील पाठविण्यात आलेल्या एकत्रित ४४ पैकी २४ नागरिकांच्या स्वॅब अहवाल निगेटीव्ह आला आहे. यामध्येच रूग्णाच्या मुलाचा अहवालाचाही समावेश आहे. अन्य ७ अहवाल यापूर्वीच निगेटिव्ह आले. यामध्ये २ अहवाल रूग्णाची पत्नी व मुलीचे आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
जीवनावश्यक वस्तूंशिवाय कोणतीही दुकाने उघडली जाऊ नये सोशल माध्यमांवर विनाकारण अफवा पसरविणाऱ्या समाजजीवन ढवळून काढणाºया चुकीच्या पोस्ट टाकणाऱ्यांवर नजर ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी पोलिसांना दिले आहे.
चार दुकानदारांच्या चाव्या जप्त
तळोधी बा : लॉकडावून उल्लंघन करणाºया चार दुकानदारांच्या चाव्या तहसीलदार मनोहर चव्हाण यांनी मंगळवारी ताब्यात घेतल्या. नागपूर रेडझोनमधून आलेल्या व्यक्तींना स्थानिक समितीने क्वांरटाईन न केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. परिसरातील शेकडो मजूर आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यात गेले होते. परत आल्यानंतर कोजबी, वैजापूर, ओवाळा, गोंविदपूर ,चारगाव येथील कोरोना प्रतिबंध समितीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद खानझोडे यांनी तपासणी केल्यानंतर जि. प. प्राथमिक शाळेत क्वांरटाईन केले. मात्र, रेडझोनमधून छुप्या मार्गाने येणाºया व्यक्तींकडे तळोधी येथील समिती दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
वाहनचालकांकडून मजुरांची लूट
गोंडपिपरी : तेलंगणा, आंध्र प्रदेशातून कसेबसे पोहोचलेल्या काही मजुरांना खासगी वाहना चालकांकडून मनमानी पैसे घेऊन लूट करत आहेत. मजुरांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. हातावर पोट असणाºया मजुरांना मदतीची गरज असताना आर्थिक लुट सुरू केल्याने मजुरांमध्ये असंतोषाची लाट पसरली आहे. या गंभीर प्रकाराकडे पोलीस व महसूल प्रशासनाने लक्ष देऊन खासगी वाहनचालकांना
तामीळनाडूहून पायी पोहोचला गडचांदुरात
गडचांदूर : देशभरात लॉकडाऊन असल्याने संभ्रमात सापडलेला तामिळनाडू राज्यातील एक कामगार चुकून रेल्वे मार्गाने गडचांदूर येथे पायी आल्याची घटना माहिती मंगळवारी उघडकीस आली. कृष्णमुर्ती असे मजुराचे नाव आहे. सारंग पेट्रोल पंपाच्या कर्मचाºयांना २२ एप्रिल रोजी दिसला. त्याला केवळ मल्लाळी भाषा बोलता येते. हिंदी भाषाही समजत नसल्याने पेट्रोल पंप कर्मचारी व साईनाथ बोअरवेलचे कर्मचाºयांनी त्याच्या भोजनाची व्यवस्था केली. सध्या तो पेट्रोल पंप परिसरातच राहत आहे.
७१ व्यक्तींची नवीन यादी तयार
शास्त्रीनगर परिसरातील रूग्णाच्या संपर्कात आल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्यानंतर मंगळवारी आरोग्य प्रशासनाने ७१ व्यक्तींची यादी केली. या व्यक्तींची आरोग्य तपासणी करून स्कॅब नमुने तपासणीकरिता पाठविण्यात येणार आहे.
बिहारच्या मजुरांना आज रवाना करणार
बिहार येथील मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी बुधवारी वर्धा आणि नागपूर या ठिकाणावरून २ वेगवेगळ्या रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. दोन्ही ठिकाणच्या रेल्वेसाठी १५ तालुक्यातील मजुरांच्या याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. बुधवारी त्यांना वर्धा व नागपूर येथे संबंधित रेल्वे गाड्यांवर पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी वाहन व्यवस्था करण्यात आली.
कृष्ण नगरात दहशत कायम
कृष्णनगर, संजय नगर परिसर कंटेनमेंट झोन व परिसराच्या बाहेरील सात किलोमीटर परिसरातील सर्व भाग बफर झोन म्हणून घोषित झाला आहे. त्यामुळे दिवसभर पोलिसांचा ताफा तैनात होता. या ठिकाणी बुधवारी ताप व आजाराबाबतची माहिती गोळा करण्यात आली. आरोग्य विभागाचे पथक घरोघरी जावून नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली.
७५० मजूर घरी परतले
नागभीड : विविध ठिकाणावरून बुधवारपर्यंत स्वगृही परतलेल्या तालुक्यातील ७५० मजुरांची प्रशासनाने स्क्रिनिंग व आरोग्य तपासणी करून जि. प. शाळेत क्वारंटाईन केले. मजुरांची संख्या अधिक असल्यास तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईन केले जात आहे, अशी माहिती आरोग्य अधिकाºयांनी दिली.