२४ सफाई कामगारांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:03 AM2017-10-29T00:03:31+5:302017-10-29T00:03:46+5:30

आपले काम जबाबदारीने केले नाही, या सबबीखाली महानगरपालिकेतील १४ सफाई कामगारांचे एक दिवसाचे वेतन कापण्यात आले. यासोबतच गणवेश देऊनही त्याचा वापर न करणाºया सहा सफाई कामगारांवर...

24 Work to the Safari Workers | २४ सफाई कामगारांवर कारवाई

२४ सफाई कामगारांवर कारवाई

Next
ठळक मुद्देमनपाने ठोठावला सहा जणांना दंड : १८ जणांचे वेतन कापले

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आपले काम जबाबदारीने केले नाही, या सबबीखाली महानगरपालिकेतील १४ सफाई कामगारांचे एक दिवसाचे वेतन कापण्यात आले. यासोबतच गणवेश देऊनही त्याचा वापर न करणाºया सहा सफाई कामगारांवर दंडात्मक कारवाई करून प्रत्येकी एक हजार रुपये वसूल करण्यात आले.
महानगरपालिकेचे उपायुक्त विजय देवळीकर यांनी शहरातील स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी शहरात फेरफटका मारला असता काही कामगार व्यवस्थित काम करीत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी कारवाईचे पाऊल उचलले.
मनपाद्वारे शहराच्या स्वच्छतेवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. शहरातील कोणत्याही वॉर्डातील रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागेत कचरा दिसू नये, अशा सूचनाही सफाई कामगारांना देण्यात आल्या आहेत. मात्र सफाई कामगार आपले काम व्यवस्थित व जबाबदारीने करीत नसल्याचे निदर्शनात येत आहे. काही कामगार हजेरी लावून गायब राहतात. याबाबतच्या अनेक तक्रारी मनपाला मिळाल्या आहेत. याची गंभीर दखल मनपाचे उपायुक्त देवळीकर यांनी घेतली. यादरम्यान, त्यांनी शहरातील अनेक वॉर्डाची पाहणी करीत स्वच्छतेचा आढावा घेतला असता त्यांना सफाई कामगारांची कामात हयगय दिसून आली. त्यामुळे त्यांनी ही कारवाई केली.
मनपाचे आरोग्य केंद्र बंद
उपायुक्त देवळीकर यांच्या या पाहणी दौºयादरम्यान शहरातील टीबी हॉस्पिटलजवळ असलेल्या मनपाचे प्राथमिक आरोग्य केंद्र बंद असल्याचे दिसून आले. याशिवाय बाबुपेठ येथील आरोग्य केंद्रातील अधिकारी केंद्रातून गायब होते. ही बाबही गंभीरतेने घेतली असून संबंधितावर कारवाई होण्याचे संकेत आहेत.
पेट्रोल पंपावरील शौचालयांचा सार्वजनिक उपयोग
चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व पेट्रोलपंपातील शौचालयाचा उपयोग आता जनता करू शकणार आहे. या पंपातील शौचालयाचा सार्वजनिक उपयोग करण्याबाबतची सूचना उपायुक्त देवळीकर यांनी जारी केली आहे.

Web Title: 24 Work to the Safari Workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.