२४५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:37 AM2021-02-27T04:37:07+5:302021-02-27T04:37:07+5:30
चंद्रपूर : काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढतच आहे. मागील २४ तासांमध्ये ४५ रुग्णांची यामध्ये भर पडली आहे. सध्या २४५ ...
चंद्रपूर : काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढतच आहे. मागील २४ तासांमध्ये ४५ रुग्णांची यामध्ये भर पडली आहे. सध्या २४५ रुग्णांवर उपचार सुरू असून, आजपर्यंत ३९८ रुग्णांचा बळी गेला आहे. विशेष म्हणजे, मागील सात दिवसांमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून, यामध्ये एका १६ वर्षीय तरुणीचा समावेश आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून गर्दी टाळावी तसेच मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करणे गरजेचे आहे. मात्र नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नसून बिनधास्त फिरताना दिसून येत आहे.
जिल्ह्यात मागील २४ तासांत १८ जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २३ हजार ५५८ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ९१५ झाली आहे. सध्या २४५ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख १३ हजार ११७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख ८७ हजार ६४४ नमुने निगेटिव्ह आले आहेत.
बाॅक्स
आजपर्यंत झालेले मृत्यू
चंद्रपूर ३६०
तेलंगणा ०१
बुलडाणा ०१
गडचिरोली १८
यवतमाळ १६
भंडारा ०१
वर्धा ०१
बाॅक्स
२४ तासांतील रुग्णसंख्या
चंद्रपूर मनपा १५
चंद्रपूर तालुका ०३
बल्लारपूर ०४
भद्रावती ०३
नागभीड ०१
मुल ०३
राजुरा ०१
चिमूर ०५
वरोरा ०८
कोरपना ०२
कोट
कोरोनाचे रुग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातून आढळून येत आहेत. कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा.
- अजय गुल्हाने,
जिल्हाधिकारी
---
अशी आहे आकडेवारी
दिनांक रुग्ण मृत्यू
२६.२.२०२१ ४५ ००
२५.२.२०२१ ४२ ०१
२४.२.२०२१ ३४ ००
२३.२.२०२१ ५५ ००
२२.२.२०२१ १४ ०१
२१.२.२०२१ २९ ००
२०.२.२०२१ २२ ००