जिल्ह्यात २४६ परवानाधारक सावकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 11:49 PM2018-09-01T23:49:44+5:302018-09-01T23:50:29+5:30

अवैध सावकारांवर कारवाईचा फास आवळला जात असल्यामुळे अनेकांनी परवानाधारक सावकारी करण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी जिल्ह्यात १० जणांनी सावकारीच्या परवानासाठी अर्ज केला आहे. मागील वर्षी २६२ सावकारांपैकी २४६ जणांनी सावकारकी परवाना नुतनीकरणासाठी अर्ज केला आहे. त्यापैकी ९७ जणांच्या परवान्यांचे नुतीकरण झाले. उर्वरित परवानाच्या नुतणीकरणाची प्रकीया सुरू आहे.

246 licensed lenders in the district | जिल्ह्यात २४६ परवानाधारक सावकार

जिल्ह्यात २४६ परवानाधारक सावकार

googlenewsNext
ठळक मुद्देअवैध सावकारीला चाप : परवान्यासाठी १० जणांनी केला अर्ज

परीमल डोहणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अवैध सावकारांवर कारवाईचा फास आवळला जात असल्यामुळे अनेकांनी परवानाधारक सावकारी करण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी जिल्ह्यात १० जणांनी सावकारीच्या परवानासाठी अर्ज केला आहे. मागील वर्षी २६२ सावकारांपैकी २४६ जणांनी सावकारकी परवाना नुतनीकरणासाठी अर्ज केला आहे. त्यापैकी ९७ जणांच्या परवान्यांचे नुतीकरण झाले. उर्वरित परवानाच्या नुतणीकरणाची प्रकीया सुरू आहे.
सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी शासनातर्फे विविध कर्ज योजना सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र कर्जासाठी विविध जाचक अटी ठेवण्यात आल्या. त्यामुळे अनेकजण या कर्ज योजनेचा लाभ घेत नाही. याचाच गैरफायदा घेत अनेकांनी अवैध सावकारीचा धंदा सुरु केला. मात्र हे सावकार पिळवणूक करून वसुली करीत असल्यामुळे शासनाने परवाना असणाऱ्यानांच सावकारी करण्याचे अधिकार दिले. त्यामुळे परवानाधारक सावकारकीच्या प्रमाणात आता वाढ होत आहे.
मागील वर्षी जिल्ह्यात २६२ परवानाधारक सावकार होते. या सावकारांना २०१८-२०१९ या वर्षांसाठी परवाना नुतणीकरण करण्यासाठी ३१ मेपर्यंत कालावधी देण्यात आला होता.
त्यापैकी २४६ जणांनी परवाना नुतणीकरणासाठी संबंधित तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयात अर्ज केला. त्यापैकी ९७ जणांच्या परवान्यांचे नुतनीकरण करण्यात आले. तर २०१८-२०१९ यावर्षांसाठी १० जणांनी नव्याने अर्ज केला आहे. त्यापैकी नऊ जणांचा परवाना तयार झाला असून एका अर्जदाराचा परवाना प्रलंबित आहे.
चार जणांविरुद्ध तक्रार
सावकारकीचा परवाना देताना व्याज दर ठरवून दिले जातात. तसेच कर्जदारावर सक्ती न करण्याच्या सुचना देण्यात येतात. मात्र हे सावकार कर्जदारांकडून वसूली करताना बळजबरी करीत असतात. यावर प्रतिबंध घालण्यासाठी शासनाने २०१४ मध्ये महाराष्ट्र अधिनियम सावकारी कायदा सुरु केला आहे. त्यानुसार आजपर्यत जिल्ह्यातील चार सावकारांवर धाड टाकण्यात आली. त्यापैकी तीन सावकारांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तर एक सावकाराचा अहवाल मागविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
केवळ ५०० रुपयांत परवाना
सावकारकीचा परवाना काढण्यासाठी ‘आपले सरकार सेवा’ केंद्रात आॅनलाईन अर्ज करुन कागदपत्राची पुर्तता करावी लागते. त्यानंतर संबंधित अर्जदाराला परवाना देण्यात येतो. त्यामुळे अनेकजण या सावकारकीचा परवाना काढून वैध सावकारी करीत आहेत.
८ ते १२ टक्के व्याज दर
परवानाधारक सावकारांकडे जे कर्जदार तारण ठेवत असतात. त्यांच्याकडून सावकार ९ टक्के व्याज आकारत असतात. तर जे कर्जदार काहीही तारण न ठेवता कर्ज घेतात, अशांकडून हे सावकार १२ टक्के व्याज आकारत असतात. त्यामुळे दिवसेंदिवस परवाना घेऊन सावकारकी करणाºयांची संख्या जिल्ह्यातच वाढत आहे.
पोंभुर्ण्यांत एकही सावकार नाही
जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये परवानाधारक सावकारीसाठी चढाओढ सुरु असताना पोंभुर्णा तालुक्यात एकही परवानाधारक सावकार नसल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून मिळाली आहे.

Web Title: 246 licensed lenders in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.