व्यसनमुक्ती केंद्रासाठी २५ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:07 PM2019-01-30T23:07:08+5:302019-01-30T23:07:25+5:30

जिल्ह्यात मागील तीन वर्षांपूर्वी दारुबंदी झाल्यामुळे काही प्रमाणात अंकुश लागला आहे. व्यसनमुक्ती संघटनेच्या माध्यमातून मला संपूर्ण चंद्रपूर जिल्हा व्यसनमुक्त करायचा आहे, असा संकल्प करीत सालेझरी व्यसनमुक्ती संघटनेच्या मागणीनुसार सालेझरी व्यसनमुक्ती केंद्रासाठी २५ लाख रुपये वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले.

25 million for the addiction center | व्यसनमुक्ती केंद्रासाठी २५ लाख

व्यसनमुक्ती केंद्रासाठी २५ लाख

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : सालेझरी व्यसनमुक्ती मेळाव्यात साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंडपिपरी : जिल्ह्यात मागील तीन वर्षांपूर्वी दारुबंदी झाल्यामुळे काही प्रमाणात अंकुश लागला आहे. व्यसनमुक्ती संघटनेच्या माध्यमातून मला संपूर्ण चंद्रपूर जिल्हा व्यसनमुक्त करायचा आहे, असा संकल्प करीत सालेझरी व्यसनमुक्ती संघटनेच्या मागणीनुसार सालेझरी व्यसनमुक्ती केंद्रासाठी २५ लाख रुपये वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले.
गोंडपिपरी तालुक्यातील सालेझरी येथे प. पुज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना सालेझरी यांच्या वतीने दारू व्यसनमुक्ती मेळावा नुकताच पार पडला. मेळाव्याचे उदघाटक म्हणून अर्थ नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार होते. मात्र त्यांना महत्त्वाचे काम आल्याने त्यांनी फोनद्वारे संवाद साधला.
मेळाव्याचे उदघाटन जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी आमदार संजय धोटे तर प्रमुख पाहुणे म्हणून सभापती दीपक सातपुते, जि. प. सदस्य कल्पना अवतरे, पं. स. सदस्य कुसुम ढुमणे ठाणेदार प्रवीण बोरकुटे, राजाभाऊ राऊत, संजय बोरकुटे, सुनंदा रामेगीवार, नितीन ढुमने, विवेक बोनपल्लीवार, विलास मांडुरवार, उपसभापती मनीष वासमवार, संजय बुटले, संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनील डोंगरे, भाऊराव ठाकरे, लक्ष्मीकांत धानोरकर, गणपत चौधरी, पंडित काळे, बालाजी बोरकुटे, दिगांबर वासेकर, अविनाश राऊत उपस्थित होते.
जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी प. पुज्य शेषराव महाराज यांच्या जीवनचरित्र्यावर प्रकाश टाकला. तर आमदार संजय धोटे यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रात संघटनेच्या माध्यमातून दारू व्यसनमुक्तीवर जनजागृतीपर कार्यक्रम, महामेळावा राबविण्याचा संकल्प केला. त्यानुसार २० फेब्रुवारी रोजी मूल तालुक्यातील टेकाडी येथे मेळाव्याचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी प. पुज्य शेषराव महाराज यांचे उत्तराधिकारी प. पुज्य संतोष महाराज यांचे प्रवचन व संकल्प कार्यक्रम पार पडला. प्रास्ताविक व्यसनमुक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनील डोंगरे, संचालन रत्नाकर चौधरी यांनी केले. योवळी प. पुज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना सालेझरीचे नामदेव भोयर, भालचंद्र रोहणकर, आशिष रोहणकर, लोहचंद लोहकरे, छत्रपती रोहणकर, साईनाथ बोरकुटे, बालाजी धोके, सुनील बोरकुटे आदी उपस्थित होते.

Web Title: 25 million for the addiction center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.