सोयाबीन व धान उत्पादकांना हेक्टरी २५ हजारांची मदत द्यावी

By admin | Published: November 23, 2014 11:15 PM2014-11-23T23:15:38+5:302014-11-23T23:15:38+5:30

केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर तांदळाची निर्यात बंद केली. त्यामुळे धानाचे दर घसरले असून निर्यातबंदी उठली नाही तर धान उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे.

25 thousand hectare assistance should be given to soybean and paddy growers | सोयाबीन व धान उत्पादकांना हेक्टरी २५ हजारांची मदत द्यावी

सोयाबीन व धान उत्पादकांना हेक्टरी २५ हजारांची मदत द्यावी

Next

चंद्रपूर : केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर तांदळाची निर्यात बंद केली. त्यामुळे धानाचे दर घसरले असून निर्यातबंदी उठली नाही तर धान उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे. यंदा सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातातून गेले. त्यामुळे सोयाबीन व धान उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने हेक्टरी २५ हजारांची मदत करावी, अशी मागणी विधानसभेतील काँग्रेसचे उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली.
यावेळी ते पुढे म्हणाले, विधानसभा निवडणुकीपूर्वी जनतेला भाजप नेत्यांनी टोलमुक्त महाराष्ट्रासह मोठमोठी आश्वासने दिली. या आश्वासनाची पूर्तता करण्याची अपेक्षा नागरिकांना आहे. मात्र बहुमतात नसलेल्या सरकारकडून टोलमुक्त महाराष्ट्र अशक्य असल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बहुमतात नसलेल्या सरकारने टाईम बाऊंड घोषित करावा, अशी मागणीही त्यांनी केली. पुढील वर्षी चंद्रपुरात मेडीकल कॉलेज निर्माण होईल, असे आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिले होते. परंतु मेडिकल कौन्सिलने मेडिकल कॉलेजची परवानगी नाकारली असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी यावेळी दिली. त्यामुळे चंद्रपुरातील केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी यासाठी प्रयत्न करावे. महानगरपालिकांतर्गत येणाऱ्या व्यापाऱ्यांना एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन सध्याच्या सरकारकडून देण्यात आले होते. त्याची पूर्तता सरकारने करावी. अन्यथा व्यापाऱ्यांकडून या सरकारविरोधात जाहीर पत्र काढावे, असे आवाहनही त्यांनी केले. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष संगीता अमृतकर, डॉ. रजनी हजारे, संतोष लहामगे, रामू तिवारी आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: 25 thousand hectare assistance should be given to soybean and paddy growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.