२५ गावांना मिळाले प्रत्येकी २५ लाख रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:30 AM2021-04-09T04:30:06+5:302021-04-09T04:30:06+5:30
गोंडपिपरी : राज्यस्तरीय डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वन जनजीवन विकास योजनेंतर्गत सहा कोटी सहा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात ...
गोंडपिपरी : राज्यस्तरीय डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वन जनजीवन विकास योजनेंतर्गत सहा कोटी सहा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय मानव वन्यजीव संघर्ष उद्भवण्याची शक्यता लक्षात घेता संवेदनशील गावांच्या विकासासाठी २५ गावांना प्रत्येकी २५ लाख रुपये याप्रमाणे निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती आ. सुभाष धोटे यांनी दिली.
धाबा वनविभाग द्वारा आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी आ. सुभाष धोटे यांच्या हस्ते लाभार्थी २५ गावांना प्रत्येकी २५ लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी उपवसंरक्षक मध्यचांदा अरविंद मुंढे, सहायक वनसंरक्षक कोडापे, एस.जे. बोबडे, तुकाराम झाडे, अशोक रेचनक, देवीदास सातपुते, संतोष बंडावार, बालाजी चानकापुरे, साईनाथ कोडापे, देवेंद्र बट्टे, सचिन फुलझले, नामदेव सांगडे, विनोद नागापुरे, अनिल कोरडे व गावकरी उपस्थित होते.