चंद्रपुरातील भिवापूर वार्डात २५ युवकांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:33 AM2021-07-14T04:33:11+5:302021-07-14T04:33:11+5:30
चंद्रपूर : लोकमत वृत्तपत्र समुहाच्या वतीने लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त नगरसेविका मंगला आखरे ...
चंद्रपूर : लोकमत वृत्तपत्र समुहाच्या वतीने लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त नगरसेविका मंगला आखरे व सामाजिक कार्यकर्ते किशोर रायपूरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १३ जुलै रोजी स्थानिक लुंबिनी बौद्ध विहार, मातानगर चौक, भिवापूर वार्ड चंद्रपूर येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, नगरसेवक दीपक जैस्वाल, माजी नगरसेवक संजय वैद्य, लुंबिनी बौद्ध विहारचे अध्यक्ष चांदेकर गुरूजी, उत्तम पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र आखरे, डॉ. किर्ती साने, लोकमत सखी मंच जिल्हा संयोजिका सोनम मडावी आदी उपस्थित होते. संचालन राजेंद्र आखरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी लोकमत सखी मंचच्या संयोजिका सुजाता बृली, राजू तुंगापीटी, बंटी इरगुल्ला, करण रायपूरकर, किशोर बोरकुटे, सागर आखरे व वार्डातील नागरिकांनी सहकार्य केले.
बॉक्स
यांनी केले रक्तदान
अमोल चौधरी, अजय आमवोजवार, श्रीनिवास मदासी, संतोष कोसरीया, विकेश मुडमुड, नरेश भुंबर, अजय पागडे, अमर टाँक, शंकर मडकाम, लक्ष्मण बंदरकंटीवार, राजेंद्र चेडमलवार, नरेश साहू, अजय यादव, राजू तुंगापिंटी, सागर आखरे, अनिल उघडे, अजय देवांगन, बापू बंदरकंटीवार, श्रीनिवास अरउटला, भारत देवांगन, सुरज कादुगुला, राहुल सुखरवार, मोहन मोहरे, सूरज मोहरे आदींनी रक्तदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले.