लोकअदालतीमध्ये २५२ प्रकरणांचा निपटारा
By admin | Published: July 15, 2016 01:06 AM2016-07-15T01:06:35+5:302016-07-15T01:06:35+5:30
जिल्हा विधीसेवा प्राधिकरण चंद्रपूरतर्फे लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
चंद्रपूर: जिल्हा विधीसेवा प्राधिकरण चंद्रपूरतर्फे लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण २५२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.
या लोकअदालतीत इलेक्ट्रीसिटी, वॉटर, टेलीफोन, पब्लिक युटीलिटीची प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित मोटार अपघाताची प्रकरणे, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, धनादेशाची प्रकरणे तसेच न्यायालयात दाखल होण्यापूर्वीचे बीएसएनएल, आयडीआय मोबाईल कंपनीची प्रकरणे, बँकेचे प्रकरण इत्यादी २५२ प्रकरणांचा निपटारा करण्यात येऊन पक्षकारांना २४ लाख ९७ हजार ४६० रुपयांची यशस्वी तडजोड करण्यात आली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकारणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय सिकची यांनी दीप प्रज्वलन करुन व माता सरस्वती यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन लोकअदालतीचे तसेच विशेष मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त सत्र न्यायाधीश मोनिका आरलैड, पी.एस. इंगळे, सचिव जिल्हा विधी सेवाप्राधिकरणाचे सचिव पी. एस. इंगळे, वकील संघाचे अध्यक्ष आर.एस. टिपले, जिल्हा सरकारी वकील पी. जी. घट्टूवार उपस्थित होते.
या लोकअदालतीमध्ये तसेच विशेष मोहिमेमध्ये प्रकरणांचा निपटारा करण्याकरिता अतिरिक्त सत्र न्यायाधीश मोनिका आरलैड, अतिरिक्त सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर आर. एम. राठोड, सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर पी. आर.कुलकर्णी यांची प्रमुख पॅनल जज म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना सहाय्यक म्हणून अॅड. राजेश्वर ढोक, अॅड. बी. एन.दिवसे, अॅड. विश्वाकिनी नळे, वामनराव पिंपळशेंडे, किरण खांडरे, वैद्यही चव्हाण यांनी यशस्वी काम पाहिले. तसेच विशेष मोहिमेचे काम न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी एस. एम.बन्सोड व वाय. के. राऊत यांनी पाहिले. जिल्ह्यामध्ये सर्वदूर पाऊस पडत असतानासुद्धा या लोकअदालत व विशेष मोहिमेमध्ये पक्षकारांनी उपस्थित राहून प्रकरणे आपसी समझोत्याने निकाली काढण्याकरिता आपसात चर्चा केली. या लोकअदालत व विशेष मोहिमेमध्ये २५२ प्रकरणे निकाली काढण्यात येऊन २४ लाख ९७ हजार ४६० रुपयांची यशस्वीपणे तडजोड करण्यात आली व सामंजस्याने वाद निकाली काढण्यात आले. याप्रसंगी दिवाणी न्यायाधीश व. स्तर ए. व्ही. कुळकर्णी, मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही.एस. खोत, न्यायदंडाधिकारी ज्ञानेश्वर हरणे व इतर न्यायिक अधिकारी उपस्थित होते. सदर लोकन्यायालयाच्या वेळी विमा कंपनीचे अधिकारी, बीएसएनएल, आयडीआय मोबाईल कंपनी, बँकेचे अधिकारी, अधिवक्ता व पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)