२८८ गावांतील २५२ कुटुंबांना महावितरणच्या प्रकाशाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:52 AM2021-03-04T04:52:26+5:302021-03-04T04:52:26+5:30
या सर्व ग्राहकांनी तीन महिन्यांपूर्वी वीज मीटरसाठी अनामत रक्कम भरलेली आहे. अजूनपर्यंत या ग्राहकांना नवीन कनेक्शन देण्यात आलेले नाही. ...
या सर्व ग्राहकांनी तीन महिन्यांपूर्वी वीज मीटरसाठी अनामत रक्कम भरलेली आहे. अजूनपर्यंत या ग्राहकांना नवीन कनेक्शन देण्यात आलेले नाही. महावितरणद्वारे घरात उजेड केव्हा पडेल, याची या ग्राहकांना प्रतीक्षा लागलेली आहे.
यासोबतच वीजमीटर असणाऱ्या ग्राहकांपैकी १ हजार ४३८ ग्राहकांनी वीजमीटरमध्ये बिघाड आहे. वीज मीटर बदलून देण्यासाठीची तक्रार महावितरणकडे केलेली आहे. या ग्राहकांच्या अर्जाला सहा महिने उलटून गेले तरी त्यांचे वीजमीटर बदलण्यात आलेले नाही. हे ग्राहक सरासरी बिलाचा भरणा करीत आहेत. नवीन वीज मीटर आणि मीटर बदलून देण्यासाठी उपरोक्त ग्राहक वारंवार वीज वितरण कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. परंतु कार्यालयातून त्यांना एकच उत्तर येत आहे. थांबा. थोड्या दिवसांत मीटर येणार आहे. एवढा कालावधी होऊनही या ग्राहकांना वीज मीटर देण्यात आलेले नाही.
कोट
नवीन कनेक्शनसाठी अर्ज आलेले आहेत. ज्यांनी डिमांड भरलेले आहे. त्यानुसार वरिष्ठ कार्यालयाला मागणी केली आहे. परंतु आमच्या कार्यालयाला वीज मीटरची अजून उपलब्धता झाली नसल्यामुळे ग्राहकांना नवीन मीटर देण्यात आलेले नाही. तसेच फॉल्टी मीटरसुद्धा बदलण्यात आलेले नाहीत.
- अमोद रंदये, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, शंकरपूर.