कत्तलखान्यात जाणाऱ्या २६ जनावरांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:19 AM2021-07-04T04:19:54+5:302021-07-04T04:19:54+5:30
सिंदेवाही : गोपनीय माहितीच्या आधारे सिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश घारे, पीएसआय गोपीचंद नेरकर व पोलीस पथक यांनी गस्तीदरम्यान ...
सिंदेवाही : गोपनीय माहितीच्या आधारे सिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश घारे, पीएसआय गोपीचंद नेरकर व पोलीस पथक यांनी गस्तीदरम्यान नागपूर येथून तेलंगणा राज्यामधील कत्तलखान्यात नेल्या जात असलेल्या २६ जनावरांची सुटका केली. या कारवाईत वाहनासह २३ लाख ४५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्व २६ जनावरांना गोरक्षण केंद्रात ठेवण्यात आले आहे. या कारवाईत दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याचदरम्यान, एक्स महिंद्रा स्कॉर्पिओ वाहन सिंदेवाहीकडून मूलच्या दिशेने सुसाट वेगाने जात असताना या वाहनाचा ठाणेदार योगेश घारे व त्यांच्या पथकाने पाठलाग करून वाहन थांबवीत झडती घेतली. त्यात तीन लाख रुपयाची देशी दारू व स्कॉर्पिओ वाहन असा एकूण १५ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.