२६० किमीचे रस्ते झाले ‘पॉश’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 11:10 PM2018-06-22T23:10:43+5:302018-06-22T23:11:09+5:30

मूल, पोंभूर्णा तालुक्याचा विकास करण्याचा ध्यास जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. त्यांचे प्रयत्न आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहकार्य यामुळे इतर जिल्हा मार्गामधील २६० किमीचे रस्ते प्रमुख जिल्हा मार्गामध्ये रूपांतरित करण्यात आले आहे.

260 km roads are 'posh' | २६० किमीचे रस्ते झाले ‘पॉश’

२६० किमीचे रस्ते झाले ‘पॉश’

Next
ठळक मुद्देपालकमंत्र्यांचा पुढाकार : नागरिकांना मोठा दिलासा

भोजराज गोवर्धन ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : मूल, पोंभूर्णा तालुक्याचा विकास करण्याचा ध्यास जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. त्यांचे प्रयत्न आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहकार्य यामुळे इतर जिल्हा मार्गामधील २६० किमीचे रस्ते प्रमुख जिल्हा मार्गामध्ये रूपांतरित करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत येत असलेल्या इतर जिल्हा मार्गाचा विकास करण्यासाठी शासनाकडून पाहिजे त्या प्रमाणावर निधीची उपलब्धता होत नाही. यामुळे २६० किमीचे रस्ते प्रमुख जिल्हा मार्गात रूपांतरित करण्यात आले असून हे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. या मार्गावर आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहे. यामुळे मूल उपविभागातील सुमारे २६० किमी रस्त्याच्या रूंदीकरणासोबतच सौंदर्यीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. इजिमा रस्त्याचे रूपांतर प्रजिमामध्ये करण्याचा प्रयोग महाराष्ट्रात पहिल्यांदाच केला असावा.
राज्याचा विकास करण्यासाठी कितीही योजना शासनाने अंमलात आणल्या तरी त्याची अंमलबजावणी करणे त्या-त्या क्षेत्रातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर अवलंबून असते. बºयाच ठिकाणी जनप्रतिनिधी जागरूक असतात तर अधिकारी उदासिन असतात. अशास्थितीत विकास करायचा कसा, असा प्रश्न निर्माण होतो.
परंतु बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील मूल तालुका हा याला अपवाद ठरला आहे, राज्याचे अर्थ नियोजन व वनमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विकासाचा मार्ग मोकळा केला आहे. या कामाला मूर्तरूप देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन उपविभागीय अभियंता नरेंद्र बुरांडे यांचे सहकार्य लाभत असल्याने मूल तालुका विकासाच्या मार्गावर वाटचाल करीत आहे. सर्वप्रथम पेठगाव-मूल-भेजगाव- बेंबाळ मार्ग प्रमुख जिल्हा मार्गात रूपांतरित करण्यात आला असून यासाठी अर्थसंकल्पात ४२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. सदर काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असून काम प्रगतिपथावर आहे. या मार्गावर भेजगावजवळ आठ कोटी रुपये खर्च करून नवीन पुलाचे बांधकाम केवळ सहा महिन्यात पूर्ण करण्यात आले आहे. इजिमा अंतर्गत येणाºया रस्त्यांची निधीअभावी दुरूस्ती रखडली होती.
यामुळे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन उपविभागीय अभियंता नरेंद्र बुरांडे यांच्या प्रयत्नातून मूल, पोंभुर्णा तालुक्यातील अनेक रस्ते प्रजिमामध्ये रूपांतरित केले आहे,. यामध्ये मार्ग क्रमांक ४९, ५४, २५, ५१ व ५५ या मार्गांचा समावेश आहे. हा रस्ता २२५ किमीचा आहे. या कामासाठी सुमारे ७० कोटी रूपयांच्या जवळपास खर्च करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता वसुले यांनीही १२५ किमी इजिमाचे रस्ते प्रजिमामध्ये रूपांतरित करण्यासाठी मंत्रालयात प्रस्ताव सादर केला आहे. यामुळे आता नागरिकांना प्रवास करणे सोयीस्कर होणार आहे.
मूल शहरही कात टाकतेय
मागील काही वर्षांपासून बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील मूल शहराचा विकास झपाट्याने होत आहे. कधी मिळाले नव्हे ते रूप या मूल शहराला देण्याचा प्रयत्न ना. मुनगंटीवार यांच्या माध्यमातून केला जात आहे. मूल शहर जणू कात टाकल्यासारखे दिसत आहे. विशेष म्हणजे, मूल शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालणाºया मुख्य रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात आले आहे, राज्याचे माजी मुख्यमंत्री कर्मवीर मा. सा. कन्नमवार यांच्या सन्मानार्थ भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. या पाठोपाठ परिसरातील विद्यार्थ्यांना वाचन, पठन, मनन, चिंतन करता यावे म्हणून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच भव्य प्रशासकीय इमारतीचेही काम युध्द पातळीवर सुरू आहे.

Web Title: 260 km roads are 'posh'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.