नागभीड तालुक्यात रोहयोच्या ५६ कामांवर २ हजार ६६७ मजूर

By admin | Published: May 9, 2017 12:35 AM2017-05-09T00:35:41+5:302017-05-09T00:35:41+5:30

नागभीड तालुक्यात महात्मा गांधी, म.ग्रा. रोहयोची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत.

2,667 laborers on 56 works in Naghid taluka | नागभीड तालुक्यात रोहयोच्या ५६ कामांवर २ हजार ६६७ मजूर

नागभीड तालुक्यात रोहयोच्या ५६ कामांवर २ हजार ६६७ मजूर

Next

घनश्याम नवघडे । लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड: नागभीड तालुक्यात महात्मा गांधी, म.ग्रा. रोहयोची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. तालुक्यात एकूण ५६ ठिकाणी कामे सुरु असून या ५६ कामांवर दोन हजार ६६७ मजूर कार्यरत आहेत.
मग्रारोहयो अंतर्गत वृक्ष लागवड, तलाव खोलीकरण, नाला खोलीकरण, पांदण रस्ते, विहीर, गुरांचे गोठे, शोषखड्डे, शौचालय, घरकुल आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. असे असले तरी तलाव आणि नाला खोलीकरण व पांदण रस्त्यांवर मजुरांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला आहे.
तलाव व नाला खोलीकरणात आकापूर येथे ५८४ मजूर, बाळापूर (बुज.) ५०० मजूर बाळापूर खुर्द २२७ मजूर, बोंड १५६ मजूर, चिखलगाव ३३५ मजूर, चिंधीचक ४२५ मजूर, देवपायली ५७२ मजूर, ढोरपा ११५० मजूर, खडकी ३०० मजूर, किरमिटी ६२४ मजूर, किटाडी मेंढा ३५६ मजूर, म्हसली ८१८ मजूर, मिथूर ९४० मजूर, मौशी १ हजार ६० मजूर, नांदेड ८४० मजूर, ओवाळा १००० मजूर, पळसगाव खुदर ७५० मजूर, पान्होळी ६४८ मजूर, पांंजरेपार २१९ मजूर, सोनापूर ४२८ मजूर, ५२० मजूर, वाढोणा ६८० मजूर, वासाळा मेंढा ५१९ मजूर असे एकूण १४ हजार ४४५२ मजूर तलाव व नालाखोलीकरणाच्या कामावर कार्यरत आहेत.
पांदण रस्त्यामध्येब ाळापूर (बुज.) ५९५, चारगाव २२७, गंगासागर हेटी ३३१, किरमिटी मेंढा ३५१. मजूर, कोसंबी गवळी ५०७ कोटगांव ३४३ मजूर, कोथुळवा ४५२ मजूर, मांगली ३३० मजूर, मांगरुड ४२० मजूर, पारडी ८६५ मजूर, पेंढरी २९० मजूर, सोनुली ४२१ मजूर, वैजापूर २५९ आणि येनोली ३९० मजूर अशा एकूण पाच हजार ७८१ मजुरांना काम मिळाले आहे. याशिवाय मग्रारोहयो अंतर्गत अनेक कामे सुरु असून त्यावरही शेकडो मजूर काम करीत आहेत.
नागभीड तालुका उद्योग विरहीत तालुका असून धानाचा हंगाम झाल्यानंतर येथील मजुरांना कोणतीच कामे नसतात. त्यामुळे मजुरांना नाईलाजास्तव रोजगारासाठी स्थलांतर करावे लागते. पण मग्रारोहयोच्या माध्यमातून आता लोकांना कामे मिळू लागल्याने त्यांच्या हाताला रोजगार प्राप्त झाले. त्यामुळे मजुरांचे होणारे स्थलांतर थांबले आहे.

मी आणि पारडी पं.स. सर्कलचे पं.स. सदस्य संतोष रडके दोघे मिळून माझ्या जि.प. क्षेत्रातील विविध कामांना भेटी दिल्या. कामे व्यवस्थित सुरु आहेत. ही कामे सुरु राहण्यास नागभीड पं.स.चे संवर्ग विकास अधिकारी प्रकाश तोडेवार यांचे नियोजन अतिशय उपयुक्त ठरले. मात्र मिंडाळा येथील मजुरांची त्यांना मिळणाऱ्या मजुरीविषयी तक्रार आहे. याबाबत मी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे.
- संजय गजपुरे, जि.प. सदस्य पारडी- बाळापूर

Web Title: 2,667 laborers on 56 works in Naghid taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.