२७ हजार १८१ नागरिक ‘होम क्वारंटाईन’मुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 05:00 AM2020-04-19T05:00:00+5:302020-04-19T05:00:47+5:30
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यातील नागरिक अतिशय सकारात्मक दृष्टी ठेवून लॉकडाऊन पाळत आहेत. अशावेळी शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत अन्य जिल्ह्यातील नागरिकांनी चंद्रपूरमध्ये येण्याचा प्रयत्न केल्यास गावागावांतील नागरिक प्रशासनाचे कान व डोळे झाले आहेत. जिल्हा नियंत्रण कक्षाकडे अशा पद्धतीच्या तक्रारी वाढल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना विषाणू संसर्गाचा एकही रूग्ण जिल्ह्यात आढळला नाही. मात्र नागपूर व यवतमाळ येथून येणाऱ्या नागरिकांबद्दल कसून चौकशी सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २७ हजार १८१ नागरीकांचे ‘होम क्वारंटाईन’ पूर्ण झाले असून त्यांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या. कोरोनापासून अलिप्त राहण्यासाठी प्रशासनाने केलेल्या आवाहनाला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तेलंगणा राज्याला लागून असलेल्या सीमांवर प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे.
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यातील नागरिक अतिशय सकारात्मक दृष्टी ठेवून लॉकडाऊन पाळत आहेत. अशावेळी शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत अन्य जिल्ह्यातील नागरिकांनी चंद्रपूरमध्ये येण्याचा प्रयत्न केल्यास गावागावांतील नागरिक प्रशासनाचे कान व डोळे झाले आहेत. जिल्हा नियंत्रण कक्षाकडे अशा पद्धतीच्या तक्रारी वाढल्या. त्यामुळे जिल्ह्यात येणाºया नागरिकांनी घरातच क्वारंटाईन करून घ्यावे व आरोग्य विभागाला माहिती द्यावी, असा सूचना प्रशासनाने दिल्या.
कुणी बाहेरून आल्यास माहिती द्या
जिल्ह्याच्या सीमावर्ती भागामध्ये ५९५ ग्रामसेवक, २ हजार ५६३ अंगणवाडीसेविका, २ हजार ३९२ मदतनीस १ हजार ९०७ आशावर्कर १ हजार ३०० ग्राम कर्मचारी कार्यरत आहेत. यांच्या सोबतीला गावातील तरूणांनी मंडळ बनवून गावामध्ये बाहेर गावावरून येणाºया प्रत्येक नागरिकाची नोंद ठेवणे सुरू केले आहे. बाहेरून येणाºया प्रत्येक नागरिकाने तपासणी करणे गरजेचे असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
१० लाख ६७ हजारांचा दंड वसूल
संचारबंदीच्या काळात शासन व प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन न करणाऱ्यांविरूद्ध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमांचे उल्लंघन करणाºया १७९ प्रकरणांत १० लाखांवर दंड वसूल, ६८७ वाहने जप्त तर ४७ नागरिकांना अटक करण्यात आली.
68 नमुने निगेटिव्ह
शनिवारी कोरोना संशयित म्हणून ८२ नागरिकांची नोंद झाली. एकून ७४ स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी ६८ नमुने निगेटिव्ह निघाले. ६ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हाबाहेरून २९ हजार १३ नागरिक आले. यापैकी १ हजार ८३२ नागरिक निगराणीखाली आहेत. २७ हजार १८१ नागरिकांनी १४ दिवसांचे होम क्वांरटाईन पूर्ण केले. ७२ व्यक्तींना इन्स्टिट्युशनल क्वारंन्टाईन करण्यात आले, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी दिली.