कोविडमधून बरे झालेल्या २७०० रुग्णांची होणार शुगर तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:20 AM2021-06-03T04:20:10+5:302021-06-03T04:20:10+5:30
भद्रावती : कोविडमधून बरे झालेले रुग्ण म्युकरमायकोसिस या रोगापासून सुरक्षित राहावेत, यासाठी शासनाच्या आदेशान्वये भद्रावती नगरपरिषदेद्वारे उपाययोजना सुरू आहे. ...
भद्रावती : कोविडमधून बरे झालेले रुग्ण म्युकरमायकोसिस या रोगापासून सुरक्षित राहावेत, यासाठी शासनाच्या आदेशान्वये भद्रावती नगरपरिषदेद्वारे उपाययोजना सुरू आहे. याच अनुषंगाने म्युकरमायकोसिस प्रतिबंधक मोहीम अंतर्गत काेविडमधून मुक्त झालेल्या जवळपास २७०० लाभार्थ्यांची शुगर तपासणी करण्याबाबतच्या मार्गदर्शन बैठकीचे आयोजन नगर परिषद भद्रावती सभागृहात करण्यात आले.
या बैठकीला नगराध्यक्ष अनिल धानोरकर, तहसीलदार महेश शितोळे, नगर परिषद मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष सिंग, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय आसुटकर, डॉ. विनय कुंभारे, उपाध्यक्ष संतोष आमने तसेच सर्व आशा स्वयंसेविका प्रामुख्याने उपस्थित होते.
म्यूकरमायकोसिसबाबतची कारणे, लक्षणे या बाबत काय करावे, काय करू नये, याबाबत बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. या आजाराचा खर्च आठ लाख रुपये अपेक्षित आहे. त्यामुळे रुग्णांनी काहीही लपवून न ठेवता वेळेवर उपचार करण्याचे आवाहन नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी केले आहे.