नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून २७ हजारांचा दंड वसूल; ॲन्टिजन तपासणीमध्ये ४ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:32 AM2021-05-25T04:32:14+5:302021-05-25T04:32:14+5:30
भद्रावती : शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने संयुक्तपणे कारवाई करीत असताना, विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या तसेच ...
भद्रावती : शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने संयुक्तपणे कारवाई करीत असताना, विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या तसेच संचारबंदीमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून २६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला असून, त्यांची ॲन्टिजन तपासणीमध्ये चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
महेश शितोळे, तहसीलदार, सुनील सिंग पवार, ठाणेदार यांच्या नेतृत्वात विशेष पथक तयार करण्यात आले आहे. त्यात शहरातील सोशल डिस्टन्सच्या अटीचे पालन न करणाऱ्या दहा दुकानदारांवर, मोटारवाहन कारवाईत १९ जणांवर, मास्क न घालणाऱ्या सहाजणांवर कारवाई करून त्यांच्याकडून २६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच शहरात विनाकारण फिरणाऱ्या ९२ नागरिकांची ॲन्टिजन टेस्ट करण्यात आली. त्यात दोन पुरुष आणि दोन महिला पॉझिटिव्ह आढळल्या. त्यांना जैन मंदिर येथील कोविड सेंटरमध्ये पाठविण्यात आले.