जिल्ह्यातील दलित वस्त्यांसाठी २८ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 11:12 PM2018-07-08T23:12:36+5:302018-07-08T23:13:06+5:30
नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर महानगरपालिका तसेच इतर नगरपालिका क्षेत्रातील दलित वस्त्यांमधील विकासकामांसाठी २८ कोटी ४२ लाख ४८ हजार रू. निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर महानगरपालिका तसेच इतर नगरपालिका क्षेत्रातील दलित वस्त्यांमधील विकासकामांसाठी २८ कोटी ४२ लाख ४८ हजार रू. निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी पुढाकार घेतला होता, हे विशेष. चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील नागरी दलित वस्त्यांसाठी नऊ कोटी ६० लाख इतका निधी सदर योजनेअंतर्गत मंजूर झाला आहे. बल्लारपूर नगर परिषद क्षेत्रासाठी सहा कोटी २९ लाख ६४ हजार ४४२ इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. भद्रावती नगरपालिका क्षेत्रासाठी दोन कोटी ८३ लाख ४४ हजार ४०२ रू., वरोरा नगर परिषद क्षेत्रासाठी एक कोटी २५ लाख ४१ हजार ५९९ रू., ब्रम्हपूरी नगर परिषद क्षेत्रासाठी एक कोटी ८५ लाख २९ हजार २८५ रू., राजुरा नगर परिषद क्षेत्रासाठी एक कोटी चार लाख २९ हजार ५५९ रू., गडचांदूर नगर पंचायत क्षेत्रासाठी एक कोटी सात लाख ८७ हजार ६१४ रू., मूल नगर परिषद क्षेत्रासाठी एक कोटी एक लाख ७५ हजार ५३४ रू, चिमूर नगर परिषद क्षेत्रासाठी ७६ लाख ४२ हजार ५३७ रू., नागभीड नगर परिषद क्षेत्रासाठी ८३ लाख ५८४ रू., सिंदेवाही नगर पंचायत क्षेत्रासाठी ६० लाख १९ हजार १९४ रू., सावली नगर पंचायत क्षेत्रासाठी ४४७ लाख ५१ हजार ४८६ रू., गोंडपिपरी नगर पंचायत क्षेत्रासाठी २९ लाख सात हजार ९८७ रू., पोंभुर्णा नगर पंचायत क्षेत्रासाठी २४ लाख ९१ हजार ८६९ रू., जिवती न.प. क्षेत्रासाठी आठ लाख तीन हजार ४४० रू. तर कोरपना न.प. क्षेत्रासाठी १५ लाख ३१ हजार ४११ रू. निधी नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला आहे.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मंजूर सदर निधी जिल्ह्यातील महानगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायत क्षेत्रातील अनुसुचित जाती लोकसंख्येच्या प्रमाणात निश्चित करण्यात आलेला आहे. या निधीच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्हयातील नागरी क्षेत्रातील दलित वस्त्यांच्या विकासाचा, सुधारणांचा मार्ग सुकर झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने विविध योजनांतर्गत निधी मंजूर करत जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण प्रकल्प मंजूर करण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या या प्रयत्नामुळे दलित वस्त्यांचा चेहरामोहरा बदलणार आहे.