वीजजोडणीसाठी २८ हजार शेतकऱ्यांचे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 10:27 PM2019-02-10T22:27:20+5:302019-02-10T22:28:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च २०१९ अखेरपर्र्यंत ५० हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याचे महावितरणचे उद्दिष्ट ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च २०१९ अखेरपर्र्यंत ५० हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याचे महावितरणचे उद्दिष्ट आहे. या योजनेला शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत असून महावितरणने पोर्टल सुरु केल्यानंतर १५ दिवसांत २८ हजार शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले. चंद्र्रपूर परिमंडळातील १ हजार ६३ शेतकऱ्यांनी या पोर्टलवरून अर्ज भरले आहेत.
शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना पारंपरिक वीजजोडणी मिळण्यात अडचणी आहेत. अशा शेतकऱ्यांनी प्राधान्याने सौर कृषिपंप देण्यात येणार आहेत. महावितरणच्या पोर्टलवरून अर्ज केलेल्या २८ हजार शेतकऱ्यांपैकी २ हजार शेतकऱ्यांच्या जमिनीचा सर्व्हेक्षण करण्यात आला. २ हजार २९३ शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत. याशिवाय अर्ज भरताना काही त्रुटी असलेले ४१९ अर्ज सध्या नामंजूर करण्यात आले असून शेतकऱ्यांनी अर्जातील माहिती दुरूस्त करून आपले अर्ज पुन्हा महावितरणच्या पोर्टलवरून भरावेत. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणने या योजनेच्या संदर्भात शेतकऱ्यांकडून वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न व त्यांची उत्तरे असलेली मार्गदर्शन पुस्तिका व व्हॉट्सअॅप अशा माध्यमांचा वापर करण्यात येत असून क्षेत्रीयस्तरावरील सर्व कर्मचारी व अभियंते सोशल माध्यमांद्वारे शेतकऱ्यांसोबत संवाद साधत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांना कृषिपंपाकरिता वीजजोडणी घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचा लाभ घेत आजपर्यंत राज्यातील सुमारे २८ हजार शेत्२ाकऱ्यांनी सौर कृषिपंपासाठी अर्ज केले आहेत.विशेषत: मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडून या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मागील मागील १५ दिवसांत चंद्र्रपूर परिमंडळातील चंद्र्रपूर विभाग २४, बल्लारपूर ४५ आणि वरोरा विभागातील १५२ तसेच गडचिरोली मंडळातील गडचिरोली ३५१, आलापल्ली २७९ आणि ब्रह्मपुरी विभागातील २१२ अशा एकूण १०६३ शेतकऱ्यांनी अर्ज पोर्टलवरून भरले आहेत.