जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना २८१ कोटींचे कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 10:34 PM2018-06-20T22:34:16+5:302018-06-20T22:34:47+5:30

खरीपाचा हंगाम सुरू झाला तरी राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देताना कचरत असताना चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मात्र तब्बल २८१ कोटी ५५ लाख रुपये शेतकऱ्यांना कर्ज वाटप करून शासनाने दिलेल्या ५१ कोटी २८२ लाखांच्या उद्दिष्टाकडे वाटचाल सुरू केली आहे.

281 crore loan disbursement to farmers from District Bank | जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना २८१ कोटींचे कर्ज वाटप

जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना २८१ कोटींचे कर्ज वाटप

googlenewsNext
ठळक मुद्दे३० जूनपर्यंत उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न : ४२ हजार ४५५ शेतकऱ्यांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : खरीपाचा हंगाम सुरू झाला तरी राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देताना कचरत असताना चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मात्र तब्बल २८१ कोटी ५५ लाख रुपये शेतकऱ्यांना कर्ज वाटप करून शासनाने दिलेल्या ५१ कोटी २८२ लाखांच्या उद्दिष्टाकडे वाटचाल सुरू केली आहे. हा लाभ जिल्ह्यातील ३९५ संलग्न संस्थांमधील ४२ हजार ४५५ शेतकऱ्यांना झाला आहे. खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांना ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत कर्ज वाटप करावयाचे आहे. मात्र चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १९ जून २०१८ पर्यंतच तब्बल ६० टक्केपेक्षा अधिक उद्दिष्ट्यपूर्ती करण्यात आघाडी घेतली आहे. उर्वरित २२ हजार ११० शेतकºयांना कर्ज वाटपासाठी ३० सप्टेंबर ही मुदत असली तरी ३० जूनपर्यंत हे उद्दिष्ट्य पूर्ण करण्याची बँकेची तयारी आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांनी ‘लोकमत’ला दिली.

जिल्हा मध्यवर्ती बॅक ही शेतकऱ्यांचा खरीपच नव्हे, तर रब्बी हंगामही वाया जावू नये, यासाठी सदैव तत्पर आहे. शासनाने बँकेला दिलेले उद्दिष्ट्य ६० टक्क्यांवर पूर्ण केलेले आहे. उर्वरित उद्दिष्ट्य येत्या ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने बँकेची यंत्रणा प्रयत्नरत आहे. उर्वरित शेतकºयांनी कर्ज घेऊन आपला शेती हंगाम करावा.
- मनोहर पाऊणकर, अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,
चंद्रपूर.

Web Title: 281 crore loan disbursement to farmers from District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.