२८७ युवक- युवतींनी केला अवयवदानाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 10:50 PM2019-05-21T22:50:14+5:302019-05-21T22:50:35+5:30

भारत हा बहुतांशी गरीब लोकांचा देश आहे. येथील कोट्यवधी लोकांना अवयवदानाची गरज आहे. परंतु आपल्याकडे पाहिजे त्या प्रमाणात अवयवदान विषयक जागृकता नसल्याने ते केवळ काही लोकच करतात. मोहन फाऊंडेशन, चेन्नई यांनी बाबा आमटे यांच्या आनंदवनातील श्रमसंस्कार छावणीत उपस्थित शिबिरार्थी युवक-युवतींसमोर अवयवदानाचे महत्त्व विषद केले.

287 Youth - Young people decide to organize childhood | २८७ युवक- युवतींनी केला अवयवदानाचा संकल्प

२८७ युवक- युवतींनी केला अवयवदानाचा संकल्प

Next
ठळक मुद्देप्रेरणादायी उपक्रम : आनंदवनातील श्रमसंस्कार छावणीत सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय

लोकमत न्यूज नेटवर्क
आनंदवन (ता.वरोरा) : भारत हा बहुतांशी गरीब लोकांचा देश आहे. येथील कोट्यवधी लोकांना अवयवदानाची गरज आहे. परंतु आपल्याकडे पाहिजे त्या प्रमाणात अवयवदान विषयक जागृकता नसल्याने ते केवळ काही लोकच करतात. मोहन फाऊंडेशन, चेन्नई यांनी बाबा आमटे यांच्या आनंदवनातील श्रमसंस्कार छावणीत उपस्थित शिबिरार्थी युवक-युवतींसमोर अवयवदानाचे महत्त्व विषद केले. छावणीतील २८७ शिबिरार्थी युवक युवतींनी कागदोपत्री पूर्तता करीत अवयवदानाचा संकल्प जाहीर केला.
जागतिक कीर्तीचे थोर समाजसेवक बाबा आमटे यांनी युवकांसोबत सामाजिक कार्य सुरू केले. युवकांना जात, धर्म व पंथ यापलिकडे जाऊन प्रत्येकाला सामाजिक बांधिलकी व राष्ट्र विकासात योगदान देता आले पाहिजे. राष्ट्रासाठी काम करता आले पाहिजे. प्रत्येकाला अवयवदान करून ते करता येईल. त्यासाठी पैशाची गरज नाही. गरिबातील गरीबही अवयवदान करून आपले सामाजिक दायित्व निभावू शकतो. हार्ट, लिव्हर, किडनी, स्कीन, नेत्रदान तथा शरिरातील बहुतांश अवयव दान करून तो गरजुंच्या उपयोगी पडू शकतो. त्यासाठी पैशाची गरज नाही. त्यामुळे सुशिक्षितांनी अवयवदानाचे महत्त्व समजून ते गरजुंना दान करण्याचे आवाहन डॉ. हेमल कान्विन्दे यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत आमटे परिवारासह श्रमसंस्कार छावणीतील मुंबई, पुणे, जालना, कोल्हापूर, लातूर, जळगाव, दिल्ली, चेन्नई, केरळ व विदर्भातून आलेल्या २८७ युवक-युवतींनी उदंड प्रतिसाद देऊन आपले फार्म भरून दिले. आणि अवयवदान चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविला. या अभियानात मोहन फाऊंडेशन चेन्नईचे डॉ. रवी वानखेडे, नागपूर येथील डॉ. हेमल कान्वेंदे आणि त्यांची चमू तथा महारोगी सेवा समिती आनंदवनचे सचीव डॉ. विकास आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर संयोजक डॉ. शितल आमटे, विश्वस्त सुधाकर कडू, गौतम करजगी, रवींद्र नलगिंटवार यांनी परिश्रम घेतले. यावेळी देशाच्या विविध भागातून आलेले २७७ युवक तथा २२० युवती अशा एकूण ४९७ शिबिराथीर्नी उपस्थिती लावली.

बाबा आमटे यांनी सामाजिक दायित्व निभावण्याचा वसा घेतलेला होता. तोच वारसा आम्ही आनंदवनवासीय समर्थपणे चालवित आहोत. जेव्हा जेव्हा समाजाला गरज पडली, तेव्हातेव्हा आनंदवन धावून गेले आहे. दिव्यांगही अवयव दान करून आपले सामाजिक दायित्व समर्थपणे निभावतील. आमटे परिवारानेही अवयवदानाचा संकल्प करून कागदोपत्री पूर्तता केलेली आहे. यापलिकडे कोणाला अवयवदान करावयाचे असल्यास त्यांनी आनंदवनाशी संपर्क साधावा.
- डॉ. शीतल आमटे, शिबिर संयोजक, आनंदवन

अवयवदानाचा फार्म भरून दिलेल्या प्रत्येक अवयवदात्याला आम्ही डोनर कार्ड भरून दिलेले आहेत. ते भरून त्यांनी पॉकीटमध्ये ठेवायचे. घरच्यांना दाखवायचे. मृत्यू दोन प्रकारे होतो, नॅचरल व ब्रेन डेथ. ब्रेन डेथमध्ये पेशंट आयसीयूमध्ये असतो. अशावेळी शरीराचे अवयवदान करू शकतो. मात्र कुटुंबाची त्यासाठी परवानगी आवश्यक असते. गरजुंनी मोहन फाऊंडेशनच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.
-डॉ. हेमल कान्विन्दे, मोहन फाऊंडेशन, नागपूर

Web Title: 287 Youth - Young people decide to organize childhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.