बल्लारपुरात २८, २९ ला रोजगार महामेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 10:15 PM2018-10-16T22:15:36+5:302018-10-16T22:15:53+5:30
अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने दि.२८ आणि २९ आॅक्टोबर २०१८ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांसाठी युथ एम्पॉवरमेंट समीट अर्थात रोजगार महामेळाव्याचे आयोजन बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथे करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने दि.२८ आणि २९ आॅक्टोबर २०१८ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांसाठी युथ एम्पॉवरमेंट समीट अर्थात रोजगार महामेळाव्याचे आयोजन बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथे करण्यात आले आहे.
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय चंद्रपूर आणि फॉर्च्युन फाऊंडेशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा रोजगार महामेळावा होत आहे. चंद्रपूर जिल्हा रोजगारयुक्त बनविण्याच्या दृष्टीने अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी मिशन सेवा, मिशन स्वयंरोजगार, मिशन कौशल्य विकास, मिशन फॉरेन सर्विसेस, मिशन उन्नत शेती, मिशन सोशल वर्क हा सहा सुत्री कार्यक्रम हाती घेतला आहे. युथ एम्पॉवरमेंट समीट हा या सहा सुत्री कार्यक्रमाचा प्रमुख भाग आहे.
या महामेळाव्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद येथील ५० नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. या महामेळाव्यासाठी केवळ आॅनलाईन नोंदणी करणाऱ्या तरूणांच्या मुलाखती सदर कंपन्या घेणार असून त्यांच्या शैक्षणिक योग्यतेनुसार नियुक्ती पत्रे मेळाव्यादरम्यानच दिले जाणार आहेत. इयत्ता १० वीपासून पदवी, पदव्युत्तर, अभियांत्रिकी, आयटीआय अशा सर्वच प्रकारचे शिक्षण घेतलेले चंद्रपूर जिल्ह्यातील तरूण-तरूणी या मेळाव्यात सहभागी होवू शकतील. यासाठी डब्लूडब्लूडब्लू. येसचंद्रपूर. कॉम/रजिस्टर.एएसपीएक्स या माध्यमातून आॅनलाईन नोंदणी इच्छुक तरूण-तरूणी करू शकतील. दि. २१ च्या सकाळी १० वाजतापासून ते २५ आॅक्टोबरला सायं.६ वाजेपर्यंत ५ दिवस आॅनलाईन नोंदणी सुरू राहतील. आॅनलाईन नोंदणी करणाºया तरूण, तरूणींनाच मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. मुद्रा योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शनसुध्दा करण्यात येणार आहेत.