२९ हजार ८८५ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 10:49 PM2019-02-20T22:49:00+5:302019-02-20T22:49:18+5:30
राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी बारावीची परीक्षा गुरूवारपासून सुरू होणार आहे. ही परीक्षा २० मार्चपर्यंत चालेल. दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहे. यंदाच्या शैक्षणिक सत्रात जिल्ह्यातील २९ हजार ८८५ विद्यार्थ्यी बारावीची परीक्षा देणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी बारावीची परीक्षा गुरूवारपासून सुरू होणार आहे. ही परीक्षा २० मार्चपर्यंत चालेल. दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहे. यंदाच्या शैक्षणिक सत्रात जिल्ह्यातील २९ हजार ८८५ विद्यार्थ्यी बारावीची परीक्षा देणार आहेत.
जिल्ह्यात ८० केंद्रावरून बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील २९ हजार ८८५ हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेकरिता अर्ज भरले होते. दहावीच्या परीक्षा ३२ हजार १४३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहे. बारावीचा पहिला पेपर इंग्रजी विषयाचा आहे. परीक्षेसाठी सहा भरारी पथक गठित करण्यात आले. पथकामध्ये शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शिक्षणाधिकारी (निरंतर) महिला विशेष पथक, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी डाएट आदींचा समावेश आहे.
परीक्षा केंद्राच्या परिसरात १४४ कलम लागू
२१ फेब्रुवारी ते २० मार्च २०१९ दरम्यान होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा व १ मार्च ते २२ मार्च २०१९ रोजी होणाºया माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा परिसरात जिल्हादंडाधिकारी यांनी सकाळी ६ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत कलम १४४ लागू केली आहे. केंद्राच्या परिसरात दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती समुहास एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. केंद्राच्या शंभर मीटर क्षेत्राअंतर्गत नियमित व रोजच्या वाहतुकीव्यतिरिक्त इतर हालचालीना प्रतिबंध राहील, उपरोक्त कालावधीत परीक्षा दिनी परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर क्षेत्रात झेरॉक्स, फॅक्स, ई-मेल, मोबाईल फोन, इंटरनेट सेवांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे.