२९८ पॉझिटिव्ह तर दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:21 AM2021-05-31T04:21:13+5:302021-05-31T04:21:13+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असून जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. मागील २४ तासात ५५३ ...
चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असून जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. मागील २४ तासात ५५३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे तर २९८ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या २५५ ने जास्त आहे. जिल्ह्यात दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये चंद्रपूर शहरातील बगड खिडकी परिसरातील ७४ वर्षीय पुरुष तर ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
बाॅक्स
असे आहे बाधित
चंद्रपूर पालिका क्षेत्र ७१
चंद्रपूर तालुका २६
बल्लारपूर ५४
भद्रावती २४
ब्रम्हपुरी ०८़
नागभीड ०२
सिंदेवाही ०६
मूल ०५
सावली ०४
पोंभूर्णा ०९
गोंडपिपरी ०५
राजुरा २७
चिमूर ०२
वरोरा २२
कोरपना २९
जिवती ०१
इतर ०३
बाॅक्स
एकूण बाधित
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८२ हजार ६०५ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ७८ हजार १८६ झाली आहे. सध्या २ हजार ९७८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ४ लाख ७० हजार ४४६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ३ लाख ८५ हजार १८७ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ४४१ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील १ हजार ३३६, तेलंगणा राज्यातील दोन, बुलडाणा एक, गडचिरोली ३८, यवतमाळ ४८, भंडारा ११, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे.