3 लाख 31 हजार नागरिकांची कोरोनाविरुद्ध लढण्याची उमेद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 05:00 AM2021-05-20T05:00:00+5:302021-05-20T05:00:37+5:30

चंद्रपूर जिल्ह्यात २२ लाख ४२ हजार ६२ नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने तयार ठेवले आहे. ५० हजार लसी मिळाल्या तरी एकाच दिवस लसीकरण पूर्ण करण्याची श प्रशासनाने ठेवली आहे. मात्र, लस पुरवठ्याच्या गोंधळात नियोजनाची उद्दिष्टपूर्ती करणे शक्यच नाही. 

3 lakh 31 thousand citizens hope to fight against Corona! | 3 लाख 31 हजार नागरिकांची कोरोनाविरुद्ध लढण्याची उमेद !

3 लाख 31 हजार नागरिकांची कोरोनाविरुद्ध लढण्याची उमेद !

Next
ठळक मुद्देलसीचा डोस घेतला : ६४ हजार ८९६ जणांचा दुसरा डोसही पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणाशिवाय पर्याय नाही, यावर आता नागरिकांचा विश्वास वाढू लागला आहे. लशींचा तुटवडा असतानाही वेळात वेळ काढून रांगेत उभे राहून लस घेण्याची मानसिकताही त्यांनी तयार केली. परिणामी मंगळवार(दि. १९)पर्यंत जिल्ह्यात ३ लाख ३१ हजार ५६३ जणांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली. त्यामध्ये दुसरा डोस घेणाऱ्या ६४ हजार ८९६ नागरिकांचा समावेश आहे. लस घेणाऱ्या नागरिकांच्या मनात आता कोरोना विषाणूविरुद्ध लढण्याची मानसिकताही तयार होऊ लागली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात २२ लाख ४२ हजार ६२ नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने तयार ठेवले आहे. ५० हजार लसी मिळाल्या तरी एकाच दिवस लसीकरण पूर्ण करण्याची श प्रशासनाने ठेवली आहे. मात्र, लस पुरवठ्याच्या गोंधळात नियोजनाची उद्दिष्टपूर्ती करणे शक्यच नाही. 
त्यामुळे उपलब्ध लसीनुसार दररोज ५० ते ७५ केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. आता ४५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटांतील नागरिकांच लस दिली जात आहे. पुरेसा लससाठा उपलब्ध होत नसल्याने चंद्रपूर महानगरपालिका व जिल्ह्यातील सर्व केंद्रांवर लसीकरण सुरू ठेवणे अशक्य झाले. आरोग्य कर्मचारी व प्रंटलाईन वर्करचा पहिला व डोस पूर्ण होण्याच्या टप्प्यात आला आहे. 
लस घेतल्याने कोरोना झाल्यानंतर प्रकृतीत समस्या निर्माण होत नाही, हे आरोग्य विभागाने जाहीर केले. त्यामुळे लसीकरणाकडे नागरिकांचा कल वाढला. ३ लाख ३१ हजार नागरिकांनी लस घेतली. लोकसंख्येच्या तुलनेत लसीकरण अत्यल्प आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात जास्त लसीकरण झाले आहे.
कोरोनाविरुद्ध लढण्याची सकारात्मक मानसिकता नागरिकांना निश्चितपणे बळ देणार, असा निष्कर्ष वैद्यकीय तज्ज्ञांनी काढला आहे. लस घेतल्याने हिंमत वाढल्याची कबुली नागरिकही देत आहेत. 

८ हजार ३६७ सहव्याधी नागरिकांना दिलासा
चंद्रपूर मनपा क्षेत्र व ग्रामीण भागात ५२ हजार ३२९ सहव्याधी नागरिकांनी पहिला डोस घेतला. प्रतिकारशक्तीमुळे शासनाने या वयोगटाला प्रथम दिले होते. मंगळवारपर्यंत ८ हजार ३६७ जणांनी दुसरा डोस घेतला. दुसरा डोस घेतल्यामुळे कोरोनाविरुद्ध लढण्याची सकारात्मकता निर्माण झाल्याचा आनंदही अनेकांनी व्यक्त केला आहे.

लशीअभावी मोहीम मंदावली
६० वर्षांवरील नागरिकांना लस घेण्यासाठी उपलब्ध डोसनुसार चंद्रपूर मनपा क्षेत्रात तीन किंवा चार केंद्र सुरू असतात. परंतु, जास्त डोस मिळत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना घरी परत जावे लागते. परिणामी, नागरिकांचे लसीकरण मंदावले आहे.  पुरेसे डोस मिळाले तरच लसीकरण पूर्ण करून कोरोनाविरुद्ध लढा देऊन मात करता येऊ शकेल.
 

१८ ते ४४ वयोगटांतील २० हजार ५१२ जणांनी घेतला डोस
केंद्रात आतापर्यंत १८ ते ४४ वयोगटांतील २० हजार ५१२ जणांचे लसीकरण झाले.  केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार या वयोगटाचे लसीकरण सध्या बंद करण्यात आले. त्यामुळे काही केंद्रांवर ४५ व ६० वर्षांवरील नागरिकांना लस घेणे शक्य होत आहे.  
 

 

Web Title: 3 lakh 31 thousand citizens hope to fight against Corona!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.