जिल्ह्यातील 3 टक्के विद्यार्थ्यांनी अडविली शाळांची संचमान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:25 AM2020-12-23T04:25:37+5:302020-12-23T04:25:37+5:30
चंद्रपूर : कोरोनामुळे अद्यापही शाळा सुरु झाल्या नाही. या पार्श्वभूमीवर शिक्षण संचालकांनी केवळ विद्यार्थी संख्या गृहित धरुन संचमान्यता न ...
चंद्रपूर : कोरोनामुळे अद्यापही शाळा सुरु झाल्या नाही. या पार्श्वभूमीवर शिक्षण संचालकांनी केवळ विद्यार्थी संख्या गृहित धरुन संचमान्यता न करता आधार कार्ड असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या गृहित धरुन संचमान्यता करण्याचे पत्र जाहिर केले आहे. त्यामुळे आधार अपडेट करण्याची प्रक्रीया सुरु युद्धपातळीवर सुरु असून ७२.७१ टक्के संचमान्यता पूर्ण झाली आहे. परंतु, अद्यापही जिल्ह्यातील सुमारे ३ टक्के विद्यार्थ्यांकडे आधार कार्डच नसल्याचे वास्तव आहे.
पहिली ते बारावीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड स्टुडंट पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक करण्यात आले आहे. जिल्ह्यातील साधारण: ९७ टक्के आधार कार्ड आहे. मात्र यातील अनेक विद्यार्थ्यांच्या आधार कार्डमध्ये छोट्या-मोठ्या चुका आहेत. त्यामध्ये सुधारणा करुन स्टुडंट पोर्टलवर अपडेट करणे सुरु आहे. सध्यास्थितीत जिल्ह्यातील ७२. ७१ टक्के विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करण्यात शिक्षण विभागाला यश आले आहे. ज्यांचे आधार कार्ड नाही. त्यांच्यासाठी तालुका स्तरावर कार्ड काढणे सुरु झाले आहे. शंभर टक्के आधार अपडेशनसाठी शिक्षण विभागाची धावपळ सुरु आहे.
बॉक्स
मुख्याध्यापकांची होतेय दमछाक
मार्च महिन्यांपासून शाळा बंद आहेत. मात्र तरीसुद्धा आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मुख्याध्यापकांची धावपड सुरु आहे. वारंवार विद्यार्थ्यांना व पालकांना सुचना देणे, कार्ड क्लेक्ट करणे, स्टुडंट पोर्टलवर अपलोड करणे या जबाबदारऱ्या मुख्याध्यापकाकडे देण्यात आल्या होत्या. त्या पार पाडताना लॅाकडाऊनमुळे सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे अपडेट कामाला गती मिळाली.
कोट
जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी आधार कार्ड काढले आहे. केवळ ४ ते चार टक्के विद्यार्थ्यांनी आधार कार्ड काढले नाही. आधार अपडेट करण्याचे काम सुरु आहे. जोपर्यंत आधार अपडेट होणार नाही. तोपर्यंत संचनामन्यता होणार नाही. असे पत्र संचालकांचे आले आहे.
- उल्हास नरड, शिक्षणाधिकारी, चंद्रपूर