३ हजार ९४५ कर्मचारी घरोघरी जाऊन देणार औषोधपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:20 AM2021-07-01T04:20:44+5:302021-07-01T04:20:44+5:30

चंद्रपूर : राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत १ ते १५ जुलै या कालावधीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती ...

3 thousand 945 employees will go from house to house to give medicine | ३ हजार ९४५ कर्मचारी घरोघरी जाऊन देणार औषोधपचार

३ हजार ९४५ कर्मचारी घरोघरी जाऊन देणार औषोधपचार

Next

चंद्रपूर : राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत १ ते १५ जुलै या कालावधीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांच्या मार्गदर्शनाखाली हत्तीरोग दूर करण्याकरिता सार्वत्रिक औषधोपचार विशेष मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला असून ९ हजार ९४५ कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांना औषधींचे वितरण करणार आहे.

सार्वत्रिक हत्तीरोग औषधोपचार मोहिमेंतर्गत दोन वर्षांखालील बालके, गर्भवती माता, एक आठवड्यापर्यंतच्या स्तनदा माता व अती गंभीर आजारी व्यक्ती यांना वगळून संपूर्ण समुदायाला जेवणानंतर वयोमानानुसार तसेच उंचीनुसार अलबेंडाझोल व आयव्हरमेक्टीन, डी.ई.सी. या औषधांची मात्रा प्रत्यक्ष खाऊ घालण्यात येणार आहेत. याकरिता जिल्ह्यात ३ हजार ९४५ कर्मचारी घरोघरी जाऊन, व्यापारी संस्थाने, शासकीय-निमशासकीय कार्यालये, कारखाने इ. ठिकाणी भोजन अवकाशात, वयोगटानुसार प्रत्यक्ष गोळ्या खाऊ घालणार असून पर्यवेक्षणाची जबाबदारी ९०४ जणांवर सोपविण्यात आली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांसमक्ष दिलेल्या हत्तीरोग विरोधी औषधाचे सेवन करून हत्तीरोगाच्या निर्मूलनास हातभार लावावा. असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रतिक बोरकर यांनी कळविले आहे.

बाॅक्स

प्रतिबंधात्मक औषध घेणे गरजेचे

हत्तीरोग हा क्युलेक्स डासाच्या मादीपासून संक्रमित होणारा दुर्लक्षित आजार आहे. या आजारामुळे रुग्ण दगावत नसला तरी, हत्तीसारखे हात, पाय सुजणे, स्तनांवर सुज येणे, अंडवृद्धी होणे अशा प्रकारच्या शारीरिक विकृती येऊ शकतात. हत्तीरोग हा शरीर विद्रूप करून अकार्यक्षम करणारा आजार असून रोग झाल्यानंतर त्यावर कोणताही परिणामकारक उपाय नाही. हत्तीरोग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक औषधांचे वर्षातून किमान एकदा सेवन करणे आवश्यक आहे.

Web Title: 3 thousand 945 employees will go from house to house to give medicine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.