शारीरिक चाचणीत ३० उमेदवार अपात्र

By admin | Published: April 9, 2017 12:54 AM2017-04-09T00:54:04+5:302017-04-09T00:54:04+5:30

पोलीस भरती प्रक्रियेच्या १३व्या दिवशी ३३८ उमेदवारांना बोलावण्यात आले.

30 candidates ineligible for physical examination | शारीरिक चाचणीत ३० उमेदवार अपात्र

शारीरिक चाचणीत ३० उमेदवार अपात्र

Next

पोलीस भरतीचा १३ वा दिवस : ३३८ उमेदवार मोजमाप व चाचणीसाठी पाचारण
चंद्रपूर : पोलीस भरती प्रक्रियेच्या १३व्या दिवशी ३३८ उमेदवारांना बोलावण्यात आले. त्यापैकी आलेल्या २२२ उमेदवारांचे शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी घेण्यात आली. त्यातून ३० उमेदवार पात्र ठरले आहेत.
जिल्हा पोलीस विभागात गेल्या १३ दिवसांपासून भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे. १३ व्या दिवशी १९२ उमेदवार मैदानी चाचणीला सामोरे गेले. शिपाई पदाकरिता भरती प्रक्रियेचीसुरुवात २२ मार्चपासून पोलीस मुख्यालयात सुरू आली आहे. एकूण ७२ जागांकरिता अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार एकूण १५ हजार ९६२ उमेदवारांनी आपले अर्ज सादर केलेले होते. यापैकी ३ हजार ४२२ महिला उमेदवार तर १२ हजार ५४० हे पुरुष उमेदवारांचा समावेश होता. आधी शारीरिक मोजमाप त्यानंतर मैदानी चाचणी आणि शेवटी लेखी चाचणी असे या भरती प्रक्रियेचे स्वरुप आहे.
शारिरीक मोजमाप प्रक्रियेत दररोज उमेदवारांना पाचारण करण्यात येत आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्णत: गुणवत्तेवर आधारीत असून अत्यंत पारदर्शकपणे तिची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
पोलीस भरतीच्या नावावर आमिष देण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्या प्रलोभणास बळी पडू नयेतसेच असे प्रलोभन कोणी देत असल्यास त्याची तत्काळ माहिती पोलीस विभागास द्यावी असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवान यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

भरतीप्रक्रियेवर ४० कॅमेऱ्यांची नजर
पोलीस भरतीप्रक्रियेवर नजर ठेवण्याकरिता ४० कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याकरिता ४० पोलीस व्हिडिओग्राफरना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या कॅमेऱ्यांमध्ये शारीरिक मोजमाप, मैदानी चाचणी व लेखी परीक्षेचा प्रत्येक्ष टिपण्यात येत आहे. याशिवाय मैदानावरही काही छुपे कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. त्या कॅमेऱ्यांद्वारे मैदानातील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यामुळे उमेदवारांसोबत येणाऱ्या नातेवाईकांना पोलीस मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून आत प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

गुप्तवार्ता विभाग सक्रीय
पोलीस भरतीमध्ये उमेदवारांना गाठून काही प्रलोभणे दिली जातात. या असामाजिक तत्त्वांवर लक्ष ठेवण्याकरिता आणि त्याला पायबंद घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी राज्य गुप्तवार्ता विभागाला गुप्त माहिती गोळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भरतीमध्ये कोणताही भ्रष्टाचार होऊ नये, याकरिता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
उमेदवारांच्या बोटाचे ठसे
भरतिप्रक्रियेत प्रथमच उमेदवारांच्या बोटाचे ठसे घेण्यात येत आहेत. उमेदवार शारीरिक चाचणीसाठी उपस्थित झाल्यावर आणि लेखी परीक्षेसाठी आल्यावर पुन्हा बोटाचे ठसे घेतले जातील. त्यामुळे एकच उमेदवार शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये उपस्थित राहण्याची दक्षता घेण्यात आली आहे. याशिवाय उमेदवाराला काही आक्षेप असल्यास मैदानावरच तत्काळ अपील करण्याची सोय करण्यात आली आहे.

Web Title: 30 candidates ineligible for physical examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.