रुग्णालयास मिळाल्या ३० अतिरिक्त खाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:08 AM2017-09-30T00:08:34+5:302017-09-30T00:08:46+5:30

वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत असणाºया जिल्हा सामान्य रुग्णालयातील महिला प्रसूती वॉर्डातील ३० अतिरिक्त खाटांच्या कक्षाचे लोकार्पण राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.

30 extra beds received from the hospital | रुग्णालयास मिळाल्या ३० अतिरिक्त खाटा

रुग्णालयास मिळाल्या ३० अतिरिक्त खाटा

Next
ठळक मुद्देपालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाणून घेतल्या रुग्णांच्या समस्या

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत असणाºया जिल्हा सामान्य रुग्णालयातील महिला प्रसूती वॉर्डातील ३० अतिरिक्त खाटांच्या कक्षाचे लोकार्पण राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थांमध्ये सुधारणा करुन या ठिकाणी दाखल होणाºया महिला रुग्णांना अतिरिक्त कक्ष देण्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार महिला प्रसूती कक्षामध्ये आधीच्या ३० खाटांच्या कक्षामध्ये आणखी ३० खाटांची भर घालण्यात आली आहे. विस्तारीत ३० खाटांच्या कक्षांचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत रुग्णालयात दाखल चिमुकलीच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी दाखल असणाºया रुग्णांची पालकमंत्र्यांनी विचारपूस केली.
रुग्णालयाबाहेर आल्यानंतरही त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांशी भेटून वैद्यकीय महाविद्यालयातर्फे मिळत असलेल्या सोयीसुविधांबाबत चौकशी केली.
या भेटीदरम्यान त्यांच्या सोबत आ. नाना श्यामकुळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.उमेश नावाडे, अतिरीक्त शल्यचिकित्सक डॉ.मुनघाटे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. भास्कर सोनारकर, मनपाचे स्थायी समिती सभापती राहुल पावडे आदी उपस्थित होते.

Web Title: 30 extra beds received from the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.